Winter Tips: थंडीत खजूर खाल्ल्यास 'या' आजारांपासून स्वत: ला दूर ठेवण्यास होईल मदत
Dates (Photo Credits: Pixabay)

सुकामेव्यामधील असा एक पदार्थ जो नुसता खाणे अनेक जण टाळाटाळ करतात. मात्र पानीपुरीमध्ये या पदार्थापासून बनवलेल्या चटणीवर मात्र ताव मारतात तो सुकामेवा म्हणजे 'खजूर' (Dates) ... सुकामेवा (Dry Fruits) हा उष्ण असल्याने शरीरास त्याचे असंख्य फायदे होतात. त्याचप्रमाणे खजूर देखील उष्ण असल्याने थंडीत त्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. खजूर हे पौष्टिक खाद्य असल्याने तसेच यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्वे असल्याने शरीरास देखील भरपूर प्रमाणात ऊर्जा मिळते आणि अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासही मदत होते.

खजूरामध्ये अनेक पोषकतत्वे असल्याने शरीरास त्याचा चांगला उपयोग होतो. थंडीत वातावरणात गारवा असल्याने उष्ण खजूर खाल्ल्यास शरीरास उष्णता मिळते. त्यासोबत शरीरात उबदारपणा आल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो.

हिवाळ्यात खजूर खाण्याचे फायदे:

1. खजुरामध्ये फायबर असते. त्यामुळे पचनक्रिया संतुलित राहते. खजूर खाल्ल्याने कफ कमी होतो. पोटाचे आजारही कमी होतात.हेदेखील वाचा- कोरोना काळात वाढले गाढवीणीच्या दुधाचे डिमांड, या दुधाचे 'हे' फायदे तुम्ही कधी ऐकले ही नसतील

2. हिवाळ्यात रोज दोन-तीन खजूर, थोडी काळीमिरी आणि वेलची पावडर हे मिश्रण गरम पाण्यात उकळवा आणि रोज रात्री झोपण्याआधी हे मिश्रण प्या. शरीरास चांगले फायदे होतील.

3. तसेच रोज सकाळी गरम दुधासोबत खजूराचे सेवन केल्यासही शरीरास अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत होते.हेदेखील वाचा- थंडीच्या मौसमात Kiwi Fruit नक्की खा , पौष्टिकांनी भरलेले या फळाचे आयोग्यदायी फायदे जाणून घ्या

4. हिवाळ्यात संधिवाताची समस्या अनेकदा उद्भवते. अशा वेळी खजूर खाल्ल्यास यापासून थोड्याफार प्रमाणात आराम मिळतो.

5. खजूरामध्ये शरीरातील रक्तदाब नियंत्रणात राहतो.

खजूर हे शरीरासाठी खूपच गुणकारी आहे. जगभरात तीस प्रकारचे खजूर मिळतात. या प्रत्येकाचे स्वत:चे असे खास गुणधर्म आहेत. त्यामुळे तो कोणता खजूर आहे यापेक्षा रोज खजूर खाण्याला महत्व द्या.