कोरोना काळात वाढले गाढवीणीच्या दुधाचे डिमांड, या दुधाचे 'हे' फायदे तुम्ही कधी ऐकले ही नसतील
Photo Credit : pixabay

गाढवीणीचे दूध (Donkey Milk) पौष्टिक मानले जाते. हे जीवनसत्त्वे आणि आवश्यक फॅटी एसिडस् समृद्ध आहे.या दुधाचा वापर रोगांच्या उपचारांमध्ये औषधी पद्धतीने वापरला जातो. हे दूध गाईच्या दुधापेक्षा पचविणे खूप सोपे आहे.तुम्हालाही हे ऐकून आश्चर्य वाटेल की इजिप्तची राणी क्लियोपेट्रा तिचे सौंदर्य टिकवण्यासाठी गाढवीणीच्या दुधात स्नान करीत असे.ज्यामुळे तिच्या सौंदर्याचे सगळे वेडे होते. एका संशोधनात असेही सिद्ध झाले आहे की, अनेक शारीरिक आजारांपासून मुक्त होण्यासाठी गाढवीणीचे दुध जास्त फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया गाढवीणीच्या  दुधाच्या फायद्यांविषयी, जे आपण कधीही ऐकले नसणार. (Winter Health Tips: हिवाळ्यामध्येही 'या' गोष्टी चुकूनही खाऊ नका, नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान )

त्वचेसाठी फायदेशीर

गाढवीणीचे दूध एक नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून कार्य करते, जे त्वचा उज्ज्वल करते आणि चमकवते.

श्वसन समस्यांसाठी फायदेशीर

गाढवीणीचे दूध श्वसन समस्येच्या उपचारांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यात असणारे मिनरल आणि कॅलरी खूप जास्त असतात. जे दमा आणि श्वसनविषयक समस्या दूर करण्यात खूप प्रभावी सिद्ध करते.

रोग प्रतिकारशक्ती वाढवते

गाढवीणीच्या दुधाचे सेवन केल्यास मुलांची प्रतिकारशक्ती वाढते. कारण त्याच्या दुधात लाइसोजाइम सारखे पोषक असतात. जे नवजात बालकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचे कार्य करते आणि बर्‍याच गंभीर आजारांपासून देखील संरक्षण करते.

एंटी एलर्जिक तत्व

एका संशोधनात असे आढळले आहे की, अनेक अँटी-एलर्जी घटक गाढवीणीच्या दुधात असतात, जे मुलांसाठी खूप फायदेशीर असतात. याद्वारे, ते अनेक प्रकारच्या एलर्जी पासून मुक्त करतात.

बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्तता

गाढवीणीच्या दुधाचे सेवन केल्याने पचनसंस्था मजबूत राहते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्या होण्याचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो.

(टीप- या लेखात दिलेल्या सर्व माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आम्ही याचा दावा करीत नाही की, लेखात दिलेली माहिती तुमच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरेल. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांशी सल्लामसलत करा)