भारताची गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनाच्या वृत्तामधून संगीतक्षेत्र सावरत असतानाच आज पुन्हा बप्पी लहरींच्या (Bappi Lahiri) निधनाने पुन्हा या जगतावर शोककळा पसरली आहे. काल रात्री उशिरा मुंबईमध्ये क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये बप्पी लहरी यांचं उपचारादरम्यान वयाच्या 69व्या वर्षी निधन झाले आहे. बॉलिवूडपासून राजकारण्यांनी बप्पी दा यांच्या निधनाच्या वृत्तावर आपला शोक व्यक्त केला आहे. उद्या बप्पी लहरी यांच्यावर अंतिम संस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.
बप्पी लहरी यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर दीपक नामजोशी यांनी बप्पी दा यांचे निधन Obstructive Sleep Apnea मुळे झाल्याचं म्हटलं आहे. मागील काही दिवसांपासून आरोग्याच्या काही तक्रारींवरून बप्पी दांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. जाणून घ्या बप्पी लहरींसाठी जीवघेण्या ठरलेल्या Obstructive Sleep Apnea आजाराविषयी!
Obstructive Sleep Apnea काय असतो?
Sleep Apnea Disorders मध्ये अनेक प्रकार असतात त्यापैकी Obstructive Sleep Apnea हा कॉमन श्वसनासंबंधी एक आजार आहे. यामध्ये झोपेत अनेकदा मनुष्याचा श्वास थांबतो, सुरू होतो. या आजारामध्ये झोपेत अप्पर एअरवेज हे ब्लॉक होतात. ब्लॉकेजमुळे डायाफ्राम आणि छातीचे स्नायू एअरवेज उघडण्यासाठी अधिक जोर लावतात. या प्रयत्नामध्ये व्यक्तीचा श्वास उथळ, किंवा तो थोडा वेळ श्वास घेणे थांबवू शकतो आणि नंतर जोरात धक्का मारून किंवा श्वास घेत पुन्हा श्वास घेतो. ज्यांना OSA चा त्रास आहे त्यांना नीट झोप लागत नाही अनेकांना त्यांच्यासोबत असे घडत आहे हे कळतही नसते.
लठ्ठपणा, inflammed tonsils किंवा हार्ट फेल्युअर, endocrine disorders यामुळे OSA होऊ शकतो.
Obstructive Sleep Apnea लक्षणं आणि वैद्यकीय सल्ला कधी घ्यावा?
मोठ्याने घोरणं हे गंभीर आजाराचं लक्षण देत असते. पण स्लीप अॅपनिया असलेली प्रत्येक व्यक्ती घोरतेच असे देखील नाही. तुम्हांला स्लिप अॅप्नियाचा त्रास असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. झोप घेऊनही थकवा जाणवणं, चीडचीड होणं, झोपेत श्वास कोंडल्यासारखं वाटणं, नीट झोप न लागणं, सकाळी तोंड सुकल्यासारखं वाटणं या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
Obstructive Sleep Apnea जीवघेणा आहे का?
Obstructive Sleep Apnea हा आजार नक्कीच जीवघेणा आहे. यामधून उच्च रक्तदाब, मधुमेह, हृद्याचे आजार जडू शकतात. जर स्लीप अॅप्निया वर उपचार केले नाहीत तर तो जीवघेणा ठरू शकतो. या आजारावर उपचार न केल्याने तुमचं आयुमान 12-15 वर्ष कमी होऊ शकतं.
Sleep Apnea आणि Obstructive Sleep Apnea मध्ये फरक काय?
Obstructive Sleep Apnea मध्ये वरच्या Upper Respiratory System ब्लॉक होते किंवा अरुंद होते त्यामुळे एअरवेज ब्लॉक होतात. मेंदू वारंवार मानवी शरीराला जागं होण्यासाठी आणि श्वासोच्छवास चालू ठेवण्यासाठी सिग्नल पाठवतो. तर Sleep Apnea मध्ये मेंदू विसरतो किंवा श्वासोच्छवास चालू ठेवण्यासाठी शरीराला सिग्नल पाठविण्यास असमर्थ आहे, परिणामी शरीर तात्पुरते श्वास घेणे थांबवते. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅपनियापेक्षा सेंट्रल स्लीप एपनिया कमी सामान्य आहे.
Continuous positive airway pressure therapy (CPAP)आणि इतर विविध तोंडातील उपकरणे व्यक्तीला सहज श्वास घेण्यास मदत करण्यासाठी वापरली जाऊ शकतात. पण हा आजार पूर्णपणे बरा होत नाही. स्लीप अॅपनिया बरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे वजन कमी करणे म्हणजे झोपताना योग्य प्रकारे श्वास घेता येऊ शकेल.
टीप: (सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहला आहे. यामधील गोष्टींना वैद्यकीय सल्ला समजू नये. अचूक निदान आणि उपचारांसाठी वेळीच वैद्यकीय मदत घ्या)