uncontrollable orgasms (Photo Credits: Pixabay)

सेक्स लाईफ हे देखील मानवी आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. आपल्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यावर त्याचा कळत नकळत परिणाम होत असतो परंतू आपल्या समाजात 'सेक्स लाईफ' बद्दल फारसं मोकळेपणाने बोलले जात नाही त्यामुळे अनेक गोष्टी या किती सामान्य आहे हे ठाऊकच नसल्याने अनेकजण त्याचं ओझ घेऊनच आयुष्यभर राहतात. रस्स्त्यातील खड्डे, विमानातील टर्ब्युलन्स किंवा गाण्याचा लाईव्ह शो या अगदी रोजच्या जीवनातील रोजच्या गोष्टींमुळे 'ऑर्गॅझम' चा अनुभव मिळू शकतो हे तुम्हांला ठाऊक आहे.ऐकून किंवा वाचून अविश्वसनीय वाटत असलं तरीही हे खरं आहे. अशाप्रकारे सेक्स व्यक्तिरिक्त एखाद्या व्यक्तीला ऑर्गेझमचा अनुभव मिळणे हा एक आजार आहे. Persistent Genital Arousal Disorder(PGAD)असं या आजाराचं नावं. युके मध्ये 61 वर्षीय महिलेला PGAD चा त्रास असल्याचं सांगितलं आहे. या आजाराद्दल बोलताना तिने गाडी चालवताना किंवा अगदी एस्कलेटरमधून येता-जाता कधीही, नकळत कोणती गोष्टी मला ऑर्गेझमसाठी ट्रिगर ठरेल याचा नेम नाही असं म्हटलं आहे. Shania Twain ची concert देखील स्त्रियांना हा अनुभव देते ही कबुली किती महिला देऊ शकतात? असा प्रश्नदेखील तिने विचारला आहे.

PGAD (Persistent Genital Arousal Disorder)हा आजार म्हणजे नेमकं काय?

PGAD ही समस्या महिलांच्या सेक्सश्युल हेल्दशी निगडीत असलेल्या समस्यांपैकी एक असली तरीही त्याच्याबाबत गैरसमजच अधिक आहेत. अनेकींना या समस्य्येमध्ये अचानक किंवा तीव्र उत्तेजना (genital arousal) निर्माण होते. ही समस्या सेक्सची इच्छा असणार्‍या किंवा त्याला चालना देणार्‍या इतर गोष्टींमुळे निर्माण होणार्‍या उत्तेजनेपेक्षा वेगळी आहे. तसेच हायपरसेक्सश्युएलिटी (Hypersexuality) आणि PGAD या समस्यादेखील वेगवेगळ्या आहेत. Hypersexuality या समस्येमध्ये उत्तेजना शिवाय किंवा त्याच्यामुळे अतुप्रमाणात सेक्स केला जातो. मात्र PGAD मध्ये ही उत्तेजना सेक्स करण्यच्या इच्छे व्यक्तिरिक्त आहे. प्रामुख्याने PGAD चा त्रास असेल तरी अनेकजणी त्यामधून निर्माण होणार्‍या विचित्र अवघडलेपणामुळे बोलणं टाळणंच पसंत करतात.

PGAD ची लक्षण

स्त्रियांमध्ये व्यक्तिपरत्वे ही लक्षणं वेगवेगळी असू शकतात. तसेच ही तात्पुरती आणि दीर्घकालीन अशी वेगळी असू शकतात. अनेकदा या समस्येमध्ये लैंगिक भागात वेदना, ओलसरपणा, डिस्ककम्फर्ट असा त्रास जाणवतो. तर दीर्घकालीन लक्षणांमध्ये नैराश्य, तणाव, न्यूनगंडाची भावना, पॅनिक अटॅक अशा समस्या जाणवतात.

PGAD च्या समस्येमध्ये अनेकदा स्त्रियांना या आजाराची लक्षणं हाताळणं कठीण असतात. यामुळे निर्माण होणारं अवघडलेपण, आजूबाजूची लोकं काय म्हणतील यामधून येणारे दडपण अधिक असतं. त्यामुळे या आजाराची अनेकजणींकडून चर्चाच होत नाही परिणामी त्यावर उपचार असूनही ते मिळू शकत नाही.