Goat Plague: दक्षिण युरोपियन देशाच्या काही भागात गोट प्लेगू नावाचा संसर्ग पसरत चालला आहे. त्यामुळे देशातील शेळ्या मेंढ्यांना पाळणे हा प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. शेळ्या मेंढ्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याने तेथील शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. या सर्व गोष्टी लक्ष्यात घेता सरकारने शेळ्या मेंढ्याच्या आयातीकडे नियंत्रण केले आहे. ऐवढेच नाही तर देशात शेळ्या मेंढ्यांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.
गोट प्लेगू म्हणजे काय?
गोट प्लेगू हा विषाणू आहे, जौ औपचारिकपणे पेस्टे डेस पेटिट्स रुमिनंट्स म्हणून ओळखला जातो. हा संसर्ग शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये आढळून येत आहे. हा विषाणू मानवावर परिणाम करतो का? या बद्दल संशोधकांनी सांगितले की, हा संसर्ग विषाणू मानवावर काही परिणाम करत नाही. पंरतू शेळ्या मेंढ्यांसाठी जीवघेणा ठरतो. ग्रीसमध्ये आता पर्यंत हजारो प्राणी या गोट प्लेगू प्रादुर्भावाने मरण पावले आहेत.
मांस उत्पादनावर बंदी
युनायटेड किंगडम देशांमध्ये मेंढ्या आणि शेळीचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, अनपॅक न केलेले मेंढी आणि शेळ्यांचे मांस यासारख्या उत्पाहनांच्या आयतीवर बंदी घालण्यात आली आहे. जेणेकरून हा आजार पसरू नये आणि दुसऱ्या प्राण्यांना याचा परिणाम होऊ नये. ग्रीस आणि रोमानिया येथून आणले जाणारे सर्व पॅकेज केलेले मेंढ्या आणि शेळीच्या दुधाच्या उत्पादनांवर बंदी आहे.
युकेचे उपमुख्य पशुवैद्यकीय अधिकारी एले ब्राऊन यांनी सांगितले की, युरोपमध्ये अलीकडेच पेस्टे डेस पेटीट्स रुमिनंट्सचा प्रादुर्भाव झाला आहे. या विषाणूचा मानवांना कोणताही धोका होत नाही. हा आजार संसर्गजन्स असल्याने रोगाचा प्रचार रोखण्यासाठी रोमानियन शेतकऱ्यांना हजारो शेळ्या आणि मेंढ्या मारण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. जुलै महिन्यात ग्रीसमध्ये या आजाराचा उद्रेक झाला. त्यामुळे ग्रीसमध्ये शेतकऱ्यांनी १०,००० मेंढ्या मारल्या.
या आजारामुळे शहरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम करत आहे. दुग्धजन्य वस्तू आणि मांस यासारख्या अनेक गोष्टीवर सरकारने बंदी घातली आहे. हा संसर्ग इतर प्राण्यांमध्ये पसरू नयेत म्हणून सरकारने आयातीवर बंदी घातली आहे.