Suicide Prevention Helplines: मानसिक आरोग्य याबद्दल मूळातच एकूण समाजामध्ये अनेक समज - गैरसमज असल्याने त्यामधून निर्माण होणार्या अनेक गुंतागुंतींच्या आजाराकडे दुर्लक्ष केले जाते. नैराश्य हे आत्महत्या करण्याचं एक मोठं कारण आहे. पण त्याबद्दल पुरेशी सजकता नसल्याने सध्या आत्महत्याग्रस्तांचं प्रमाण अधिक आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी आणि त्याबद्दल सजगता निर्माण करण्यात जगभरात 10 सप्टेंबर हा दिवस World Suicide Prevention Day म्हणून साजरा केला जातो. आत्महत्या हा एका क्षणात घेतलेला निर्णय नसतो. त्याच्या मागे अनेक दिवस त्या व्यक्तीच्या मनात विचार रेंगाळत असतात. त्यामुळे आत्महत्या रोखायची असेल तर त्या व्यक्तीसोबतच त्याच्या आजूबाजुला असणार्यांनी देखील संबंधित व्यक्तीमध्ये काही बदल जाणवत असल्यास त्याच्याशी योग्य वेळी बोलणं गरजेचे आहे. मग तुमचं बोलणं येऊन घेण्यासाठी नेमक्या कोणत्या यंत्रणा भारतामध्ये काम करत आहेत? तुमच्या मनात भीतीचं किंवा नैराश्याचं जाळं पसरत असेल तर नेमकं कुणाकडे मन हलकं करू शकाल? हे जाणून घेण्यासाठी या काही महत्त्वाच्या हेल्पलाईन तुम्हांला फायदेशीर ठरतील.
2003 साली पहिल्यांदा International Association of suicide prevention (IASP) आणि जागतिक आरोग्य संघटनेने एकत्र येऊन पहिला World Suicide Prevention Day साजरा केला होता.
मुंबई बीएमसी
सध्या कोरोना संकटकाळाचा सामना करताना आर्थिक विवंचना ते अगदी या आजाराची भीती, सगळं जग ठप्प झाल्याने निर्माण झालेली अनिश्चितता याचा सामना करताना अनेकांचं मानसिक आरोग्य देखील बिघडलं आहे. मग अशाकाळात मुंबई महानगरपालिकेने खास मानसोपचार तज्ञांची देखील टीम सक्रीय केली आहे.
द वेंट
द वेंट ही आता एक आधुनिक टेलिफोनिक माध्यम आहे. ज्याच्या मदतीने एकटेपणाशी, नैराश्याशी सामना करणारी व्यक्ती मनातील बोलू शकते. सल्ला घेऊ शकते. ही सेवा मोफत आहे. 8448440267 या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता.
भारतामधील काही महत्त्वाच्या संस्था, एनजीओ ज्या तुम्हांला आत्महत्येपासून प्रवृत्त करण्यासाठी मदत करू शकतात.
- The Samaritans - +91 84229 84528 / +91 84229 84529 / +91 842
स्नेहा सुसाईड प्रिव्हेंशन सेंटर - 044 2464 0050
- Connecting - 9922001122 किंवा 8002094353
- आसरा - 022 2754 6669
- COOJ Mental Health Foundation - 098225 62522
जगभरात आत्महत्या ही अत्यंत संवेदनशील बाब आहे. जगात सुमारे 40 सेकंदला एक व्यक्ती आत्महत्या करत आहे. मृत्यूच्या कारणामध्ये हे 15 व्या क्रमाकांचं कारण आहे. तर स्त्रियांच्या तुलनेमध्ये पुरूषांमध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण अधिक आहे. एक आत्महत्या अंदाजे 135 जणांवर परिणाम करते. त्यामुळे तुमच्या आजुबाजूच्या व्यक्तीला आत्महत्येसारखे टोकाच्या निर्णयापर्यंत पोहचण्याआधीच त्यापासून प्रवृत्त करा.