World Malaria Day 2021: आज जागतिक मलेरिया दिवस! मलेरिया निर्मूलनात भारत पहिल्या क्रमांकावर, मलेरिया झाल्यास काय करावे? जाणून घ्या
मच्छर (Photo Credits: Pixabay)

World Malaria Day 2021: 'मलेरिया' हा जगातील सर्वात प्राचीन रोगांपैकी एक आहे, जो डास चावल्याने पसरतो. मलेरियाच्या पेशंटला वेळेवर उपचार न दिल्यास ते प्राणघातक ठरू शकते. भारत मलेरियावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झाला आहे. ही भारतासाठी एक चांगली बाब आहे. मलेरिया हा जगातील अमेरिका, आशिया आणि आफ्रिका भागांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेसाठी (World Health Organization) एक गंभीर आव्हान आहे.

जागतिक मलेरिया दिनाची सुरुवात कधीपासून झाली -

डासांच्या चाव्याव्दारे पसरलेल्या या आजाराचे स्वरूप आणि संक्रामकता पाहता, जागतिक आरोग्य संघटनेने असे आढळले की, या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारी उपायांसह लोकांमध्ये मलेरियाविषयी जागरूकता असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन डब्ल्यूएचओच्या जागतिक आरोग्य असेंब्लीच्या मे 2007 च्या 60 व्या अधिवेशनात 25 मे रोजी 'जागतिक मलेरिया दिवस' साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मलेरिया नियंत्रण प्रोग्रामद्वारे बर्‍याच लोकांचे जीव वाचू शकतात. (वाचा - World Malaria Day 2020: जागतिक मलेरिया दिन इतिहास, महत्त्व आणि वर्तमान)

मलेरिया कसा पसरतो

'मलेरिया' चे मुख्य लक्षण म्हणजे थंडी-ताप, डोकेदुखी आणि उलट्या. डॉक्टरांच्या मते, जेव्हा एखाद्या संसर्गित मादी अॅनाफिलास डास एखाद्या निरोगी व्यक्तीला चावतो तेव्हा तो मलेरियाच्या परजीवींना त्याच्या लाळेतून रक्तात वितरीत करतो. मलेरियाचा डास चावल्यानंतर 10 ते 12 दिवसांनी एखाद्या व्यक्तीमध्ये मलेरियाची लक्षणे दिसू लागतात.

भारतात मलेरिया नियंत्रण कार्यक्रम

या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारताने फार पूर्वी उपाययोजना करण्यास सुरवात केली होती. स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने मलेरिया निर्मूलनासाठी 1953 मध्ये 'राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रम' (एनएमसीपी) चालविण्यासह डीडीटीची फवारणी सुरू केली. यानंतर 1958 मध्ये 'डब्ल्यूएचओ' च्या विनंतीवरून 'राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन कार्यक्रम' (एनएमईपी) सुरू झाला. आज जागतिक मलेरिया दिनाच्या निमित्ताने मलेरिया पसरणार्‍या अशा छोट्या छोट्या गोष्टींची आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. आपण आपल्याभोवती घाणेरडे पाणी साचू देऊ नये. पाण्याची टाकी, कुलर व पाण्याचे तलाव यांची नियमित साफसफाई करावी. मलेरियाची काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना भेटल्यानंतर लगेचचं उपचार सुरू केले पाहिजेत.

डब्ल्यूएचओचा भारतात मलेरिया निर्मूलन कार्यक्रमांचा स्तुत्य अहवाल

जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या वर्षी सांगितले की, दक्षिण आशियाई प्रदेशात मलेरियाच्या सर्वात कमी घटनांमध्ये भारत अव्वल क्रमांकावर आहे. वर्ल्ड मलेरिया रिपोर्ट 2020 नुसार 2000 मलेरियाच्या घटनांची संख्या दोन कोटींवरून कमी करून साडेपाच दशलक्ष करण्यात भारताला यश आले होते. भारतातही मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. 2019 मध्ये जागतिक स्तरावर 229 दशलक्ष मलेरियाचे रुग्ण आढळले. म्हणूनचं संपूर्ण जगात मलेरियामुळे दरवर्षी सुमारे 6 लाख 60 हजार लोकांचा मृत्यू होतो. यामध्ये मुलांची संख्या अधिक आहे. आफ्रिकेतील उप-सहारा भागात मलेरियामुळे आजही सर्वाधिक मुले मरत आहेत.