World Environment Day 2020: पर्यावरण संवर्धन करण्यासाठी 5 सोप्या टीप्स, व्यक्तिगत आयुष्यातही वापरू शकता
Environment | (Photo Credits: Pixabay)

जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day 2020) आणि 5 जून हे आता एक समिकरणच झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात आह. असा विशेष दिवस साजरा करणे ही काळाजी गरजही आहे. विकासाच्या नावाखाली अखंड मानव जमातिने जगभात जो धुमाकूळ घातला आहे. त्याचे दुष्परणामही अखंड मानवजातीला भोगावे लागत आहेत. या दुष्परीनामाचे पहिले उदाहरण म्हणजे पर्यावरणीय बदल. पर्यावरण बदलाबाबत आपण अद्यापही गंभीर नाही. म्हणूनच जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day) आयोजित करुन जनजागृती करण्याची आवश्यकता जगभरातील अनेक देशांना वाटू लागली. त्यातूनच ही संकल्पना पुढे आली. दरम्यान, आपणही पर्यावरण संरक्षण करु इच्छित असाल तर, अगदीच फार काही मोठे करण्याची इतक्यात गरज नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टींतूनही पर्यावरण संवर्धन (Environmental Conservation Tips), संरक्षण करता येते.

पर्यावण संवर्धनासाठी 5 छोटे उपाय

वापरलेल्या वस्तूंच्या पाकिटांची विल्हेवाट

स्वच्छता हा पर्यावरण संवर्धनाचा प्रमुख पाया आहे. आपण वापरलेल्या वस्तू, रसायने, औषधं त्यांची पाकिटं या सर्वांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लाऊन पर्यावरणास हातभार लावता येऊ शकतो. जसे की पाण्याच्या, शितपेयाच्या बाटल्या, औषधं फास्टफू आदींची पाकिटं आपण उघड्यावर फेकतो. जी प्लॅस्टीक अथवा निसर्गात विघटन न होणाऱ्या पदार्थापासून बनवलेली असतात. त्यांची जरी आपण योग्य विल्हेवाट लावली तरी पर्यावरणास हातभार लागू शकतो.

प्रदुषण

हवा, माती आणि पाणी प्रदुषणामुळे निसर्गाला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचते. त्यामुळे शेतीमध्ये खतं, औषंध वापरताना ती हवा, पाणी, माती आदींमध्ये मोठ्या प्रमाणावर मिसळणार नाहीत याची काळजी घ्या. शेत, जंगल आदींमध्ये आग लागली, लावली जाणार नाही याची काळजी घ्या. शेतातील कचरा जाळण्याऐवजी जमीनीत पुरा. ज्यामुळे धुर होणार नाही. वायू आणि जल प्रदुषण होणार नाही. (हेही वाचा, World Environment Day 2020: मासिक पाळी काळात वापरलेल्या Cotton Pads चा पुनर्वापर करून पर्यावरण संवर्धनात करा सहाय्य)

बेसुमार खनीज/मृदा उपसा थांबवा

आपल्यापैकी अनेकांना असे वाटते की खनीज म्हणजे धातू, कोळसा अथवा यासारख्याच गोष्टी. पण तसे नाही निसर्गातील विशिष्ट प्रकारचा दगड, वाळू, माती हे सुद्धा खनीजच आहे. बांधकाम क्षेत्र जसजसे विस्तारत जाईल तसतसे दगड, वाळू, माती यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. परिणामी डोंगरच्या डोंगर फस्त झाले आहेत. विटांसाठी माती संपवली जात आहे. याचा अर्थ असा नव्हे की घरं, इमारती उभारुच नयेत. पण, हे करत असताना निसर्गाला हानी पोहोचणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी.

Eco-Friendly वस्तू, वाहने वापरायचाच

कारणाशिवाय मोठी वाहन वापरणे टाळा. सायकलचा अधिकाधिक वापर करा. प्रदुषन करणाऱ्या वस्तू वापरणे टाळा. आपल्यापैकी अनेकांना असे वाटते की, एकट्या माझ्या वाहन अथवा वस्तू वापरामुळे असे कितीसे प्रदुषण होणार आहे? पण असे नाही, आपल्यापैकी असे वाटणाऱ्यांचीच संख्या अधिक आहे. त्यामुळे काळजी घ्या. जवळच्या आणि शक्य असेल तर लांबच्यासुद्धा प्रवासासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करा.

वस्तुंचा पुनर्वापर करा

अनेकदा आपण मनावनिर्मित वस्तू वापरतो आणि फेकून देतो. मात्र, तसे न करता वस्तुंचा पुनर्वापर करा. जसे की आपल्या घरात प्लॅस्टीकच्या अनेक वस्तू असतात. त्यातील अनेक सिंगल यूज असतात. अशा वस्तूंचा पुनर्वापर करा. ज्या पुनर्वापर करता येणार नाहीत अशा वस्तू टाकून देण्याऐवजी त्या जमवा. एकत्र करा आणि रद्दीच्या दुकानांमध्ये विका. ज्यामुळे पुढे त्यांवर कारखान्यांमध्ये प्रक्रिया केली जाईल. मात्र, या वस्तू आपण निससर्गात इतरत्र फेकाल तर त्या वर्षानुवर्षे तशाच राहतील. त्याचे विघटन होत नाही. परिणामी निसर्गाला हानी पोहोचते.

कोरना व्हायरस संकटाने जगासमोर आव्हान उभे केले आहे. आजही या रोगावर इलाज उपलब्ध नाही. त्यामुळे जगभरातील अपवाद वगळता अनेक देशांनी लॉकडाऊन लागू केला आहे. लॉकडाऊन काळाचा पर्यावरणावर प्रंचड मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिणाम झाला आहे. याचाच अर्थ असा की लॉकडाऊन काळात प्रदुषणात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्यामुळे वरील टीप्सचा वापर आपण जरी आपल्या व्यक्तिगत जीवनात केला तरीसुद्धा आपण पर्यावरण संवर्धनास हातभार लाऊ शकतो.