World AIDS Day 2022: जागतिक एड्स दिनानिमित्त Messages, Quotes, Slogans शेअर करत समाजात वाढवा जनजागृती
AIDS Day 2022| File Image

1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स निर्मुलन दिवस (World AIDS Day) म्हणून साजरा केला जातो. एड्स बाबत समाजात जनजागृती करणं आणि या आजाराबाबतचे समज-गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने हा दिवस पाळला जातो. जागतिक स्तरावर एड्स हा एक भयंकर आजार असल्याने त्याला आटोक्यात ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काय काय केले जाऊ शकते याची माहिती या दिवसाचं औचित्य साधून दिली जाते. "Equalize" या थीम वर आधारित यंदाचा एड्स निर्मुलन दिन पाळला जाणार आहे. जगभरातील लोकांना एचआयव्ही विरुद्धच्या लढाईत एकत्र येण्याची, एचआयव्हीसह जगणाऱ्यांना पाठिंबा देण्याची आणि एड्स-संबंधित आजाराने निधन झालेल्यांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. या दिवसाचं औचित्य साधत Facebook Messages, WhatsApp Status द्वारा तुम्ही जनजागृती करणारे इमेजेस शेअर करू शकता.

1 डिसेंबर, या जागतिक एड्स दिनानिमित्त UNAIDS कडून सर्वांना आवाहन करण्यात आले आहे की, एड्स निर्मूलनाच्या लढ्यात अडथळे आणणाऱ्या अन्यायांचा सामना करा. त्यासाठीच "Equalize" ही थीम आहे.

एड्स निर्मुलन दिन 2022

AIDS Day 2022| File Image
AIDS Day 2022| File Image
AIDS Day 2022| File Image
AIDS Day 2022| File Image
AIDS Day 2022| File Image

जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने 1 डिसेंबर 1988 रोजी स्थानिक आणि राष्ट्रीय अधिकारी, आंतरराष्ट्रीय संस्था आणि खाजगी नागरिक यांच्यात माहितीच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक एड्स दिन पाळण्यास सुरूवात केली. 1988 मध्ये, जेव्हा जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला, तेव्हा असा अंदाज होता की 90,000 ते 150,000 लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह होते, ज्यामुळे एड्स होतो. 20 वर्षांच्या आत, 33 दशलक्षाहून अधिक लोकांना एचआयव्हीची लागण झाली होती आणि 1981 पासून, जेव्हा एड्सची पहिली घटना नोंदवली गेली तेव्हापासून 25 दशलक्षाहून अधिक लोक या आजाराने मरण पावले आहेत. परिणामी, एचआयव्ही/एड्सबद्दल समाजांना शिक्षित करण्यासाठी जागतिक संस्थांना एकत्रित करून निधी देण्यावर एड्स जागरूकता चळवळींनी अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.