Navratri 2024 Date: नवरात्री (Navratri 2024) ला शारदीय नवरात्री (Shardiya Navratri 2024) असेही म्हणतात. हा नऊ दिवसांचा सण आहे जो भारतातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. हिंदू संस्कृतीत नवरात्रीला खूप महत्त्व आहे. हा सण देशभरात मोठ्या उत्साहाने सादरा केला जातो. हा सण विशेषतः देवी दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांच्या पूजेला समर्पित आहे. नवरात्र वर्षातून दोनदा साजरी केली जाते. मार्च-एप्रिलमध्ये चैत्र नवरात्री आणि नंतर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये शारद नवरात्र साजरी केली जाते. नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये भक्त दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा करतात. प्रत्येक दिवस देवीच्या वेगवेगळ्या रूपाशी संबंधित असतो आणि त्या दिवसाचा रंग वेगळा असतो.
नवरात्र 2024 तारीख -
नवरात्र सलग नऊ रात्र आणि दिवस साजरी केली जाते आणि त्यानंतर दहावा दिवस दसरा किंवा विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. तो दरवर्षी वेगवेगळ्या तारखांना येतो. यावर्षी नवरात्रीचा उत्सव 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून तो 12 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. महाअष्टमी आणि महानवमी या दोन्हींचे व्रत शुक्रवारी, 11 ऑक्टोबर रोजी पाळले जाईल. (हेही वाचा -Shardiya Navratri 2024: यंदा 'या' वाहनावर स्वार होऊन येत आहे देवी दुर्गा; नवरात्रीमध्ये चुकूनही करू नका 'या' चुका)
नवरात्रीचे महत्व -
हा सण आश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीने सुरू होतो, जो सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान असतो. पौराणिक कथेनुसार, रावणाचा वध करण्याआधी आणि त्याच्या पत्नीची सुटका करण्यापूर्वी भगवान राम आणि त्याची पत्नी सीता यांना नऊ दिवस देवी दुर्गेची उपासना करावी लागली होती. त्यामुळे हा सण वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी देखील साजरा केला जातो. (हेही वाचा - Shardiya Navratri 2024 Ghatasthapana Muhurat: घटस्थापना कधी आहे? शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व घ्या जाणून)
नवरात्री पूजाविधी -
नवरात्रीमध्ये लोक दुर्गा देवीची पूजा करण्याबरोबरच नऊ दिवस उपवासही करतात. या दिवशांत लोक बऱ्याचदा कठोर उपवासाचे पालन करतात. फक्त फळे, दूध आणि इतर हलके अन्नपदार्थ खाऊनही नऊ दिवस उपवास करण्याची प्रथा आहे. काही लोक पूर्ण जल उपवास देखील निवडतात ज्यामध्ये नऊ दिवस कोणीही घन किंवा द्रव स्वरूपात कोणतेही जेवण घेत नाही. नवरात्रीत उपवास व्यतिरिक्त, मुख्य विधी केला जातो तो म्हणजे घटस्थापना. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. या दिवशी पवित्र पाण्याने भरलेला कलश आंब्याच्या पानांनी सजवला जातो आणि त्यावर एक नारळ ठेवला जातो. या कलशाची नऊ दिवश दुर्गादेवीचे प्रतीक म्हणून पूजा केली जाते. हे भांडे पवित्र, स्वच्छ ठिकाणी ठेवले जाते आणि नऊ दिवस त्याची पूजा केली जाते.