Hartalika Tritiya 2022 Date: हरितालिका तृतीया भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते. हरितालिका तृतीया (Hartalika Tritiya) हे अखंड आणि सुखी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा देणारे व्रत आहे. या तीजच्या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि भगवान गणेश आणि शिव-पार्वतीची पूजा करतात. तसेच त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि कौटुंबिक सुखासाठी प्रार्थना करतात. हे व्रत निर्जल राहून पाळले जाते. रात्री भगवान शिव आणि माता पार्वतीच्या गाण्यावर नृत्य केले जाते. यंदा हरितालिका तृतीया व्रत 30 ऑगस्ट रोजी म्हणजेचं मंगळवारी आहे.
हरितालिका तृतीया व्रताचे महत्व -
असं म्हटलं जातं की, हे व्रत केल्याने सौभाग्य प्राप्त होते. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत आणि उपवास करतात. हरितालिका तीजचा उपवास विवाहित महिलांव्यतिरिक्त अविवाहित मुली करतात. या व्रताच्या पुण्य प्रभावामुळे अविवाहित मुलींना इच्छित वर प्राप्त होतो. (हेही वाचा - Ganpati Invitation Card Messages in Marathi: गणेशोत्सवात प्रियजणांना घरी आमंत्रित करण्यासाठी WhatsApp Messages, Images च्या माध्यमातून शेअर करा या 'निमंत्रण पत्रिका' )
हरितालिका तृतीया 2022 शुभ मुहूर्त -
हरितालिका तृतीया- सकाळी 05:57 मिनिटे ते 08:31 मिनिटांपर्यंत
कालावधी: 2 तास 33 मिनिटे
हरितालिका पूजा विधी -
पती-पत्नीच्या अतूट नात्याच्या या सणावर महिला शिव-पार्वती आणि श्री गणेशाच्या शुद्ध मातीच्या प्रतिकात्मक मूर्ती बनवून त्यांची पूजा करतात. या दिवशी तांदूळ, फुले, बेलपत्र, नारळ, दुर्वा, मिठाई इत्यादींनी देवाची भक्तिभावाने पूजा करावी. तीन देवतांना वस्त्र अर्पण केल्यानंतर हरितालिका तीज व्रताची कथा ऐकावी किंवा वाचावी. आरती झाल्यावर आपले जीवन शिव-गौरीप्रमाणे परस्पर प्रेमाने सदैव बांधलेले राहावे अशी प्रार्थना करावी.
हरितालिका तृतीया उपवासाची कथा -
पौराणिक मान्यतेनुसार, माता पार्वतीला तिच्या अनेक जन्मांसाठी भगवान शिव यांना पती म्हणून स्विकारायचे होते. यासाठी त्यांनी बालपणी हिमालय पर्वताच्या गंगेच्या तीरावर तपश्चर्या केली. या तपश्चर्येमध्ये माता पार्वतीने अन्नपाणीही सेवन केले नाही. ती फक्त कोरडी पाने चावून ध्यान करत असे. माता पार्वतीला या अवस्थेत पाहून तिच्या आई-वडिलांना खूप वाईट वाटायचे. एके दिवशी देवऋषी नारद भगवान विष्णूच्या वतीने पार्वतीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन त्यांच्या वडिलांकडे गेले. पार्वतीच्या वडिलांनी लगेचच या प्रस्तावाला होकार दिला. जेव्हा माता पार्वतीला तिच्या वडिलांनी लग्नाची बातमी सांगितली तेव्हा त्या खूप दुःखी झाल्या.
माता पार्वतीचे हे दु:ख तिच्या एका मैत्रिणीला दिसले आणि तिने तिच्या आईला याबाबत विचारले. त्यावर त्यांच्या आईने त्या मैत्रिणीला सांगितले की, पार्वती शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करत आहेत. पण पार्वतीने विष्णूशी लग्न करावे अशी तिच्या वडिलांची इच्छा आहे. यावर तिच्या मैत्रिणीने माता पार्वतीला वनात जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर माता पार्वतीनेही तसेचं केले. पार्वती एका गुहेत गेली आणि भगवान शंकराच्या तपश्चर्येत लीन झाली. भाद्रपद शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी, देवी पार्वतीने वाळूचे शिवलिंग बनवले आणि शिवाची स्तुती सुरू केली. अशा कठोर तपश्चर्येनंतर भगवान शिवांनी माता पार्वतीला दर्शन दिले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले.