Vinayak Chaturthi 2020: विनायक चतुर्थी निमित्त गणरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा विधी

वर्षातून येणा-या गणेश चतुर्थी प्रमाणे दर महिन्यात येणा-या विनायक चतुर्थी विशेष मानली जाते. या दिवशी भक्तगण साग्रसंगीत देवाची पूजा करून अनेक जण उपवास धरतात.

Vinayak Chaturthi 2020: विनायक चतुर्थी निमित्त गणरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा विधी
Ganesh Jayanti | Photo Credits: Instagram

Vinayak Chaturthi 2020 Muhurat: भक्तांवरील विघ्न दूर करणा-या विघ्नहर्त्या गणेशाची पूजा अर्चा करून आपली मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी विनायक चतुर्थी चा दिवस शुभ मानला जातो. अमावस्या नंतर येणाऱ्या शुल्क पक्ष चतुर्थीला विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi) म्हणतात. त्याचसोबत पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्ष चतुर्थीला संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) असे म्हटले जाते. विनायक चतुर्थीचे व्रत प्रत्येक महिन्यात करावे लागते. या दिवशी गणेश भक्त आपल्या श्रीगणेशाची आराधना त्याला प्रसन्न करतात.

वर्षातून येणा-या गणेश चतुर्थी प्रमाणे दर महिन्यात येणा-या विनायक चतुर्थी विशेष मानली जाते. या दिवशी भक्तगण साग्रसंगीत देवाची पूजा करून अनेक जण उपवास धरतात. Vinayak Chaturthi 2019: विनायक चतुर्थी निमित्त शुभेच्छांसाठी खास मराठी WhatsApp Messages, SMS, Wishes आणि शुभेच्छापत्र!

पाहा विनायक चतुर्थीचा मुहूर्त:

आज दुपारी 11 वाजल्यापासून दुपारी 1 वाजून 38 मिनिटापर्यंत विनायक चतुर्थीचा शुभमुहूर्त आहे.

विनायक चतुर्थी चा पूजाविधी:

या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर धूतवस्त्र नेसावे. घरात स्वच्छ ठिकाणी अगर देव्हार्‍यासमोर एक स्वच्छ केलेला पाट ठेवावा त्यावर पिंजरीने एक आठ पाकळ्यांचे कमळ काढावे. त्यावर सोन्याचांदीची अगर तांब्यापितळेची छोटी मूर्ती असल्यास ती ठेवावी मूर्ती नसल्यास एक सुपारी ठेऊन पूजा करावी आणि संध्याकाळी उदबत्ती ओवाळून विनायकावर पाणी शिंपडावे व पुनरागमनायच असे म्हणून मूर्ती अगर पूजेला लावलेली सुपारी हलवावी अशा रीतीने, श्रद्धेने विनायकी चतुर्थी व्रत पूजन करून पोथी वाचावे अथवा नामस्तोत्र म्हणावे. पूजेनंतर गणपतीच्या आरत्या म्हणाव्या.

श्री गणेशाची पूजा करताना आणि दुर्वा वाहताना 'ॐ गणपतेय नम:' या मंत्राचा जाप करावा. गणपतीला मोदकांचा नैवेद्य, जास्वंद आणि दुर्वा अर्पण कराव्यात. या दिवशी कोणाबद्दल ही वाईट विचार करु नये. विनायक चतुर्थीला सौभाग्यवती महिलांनी उपवास ठेवावा. चतुर्थीला गणपतीची मनोभावे पूजा करुन तुमच्या मनातील इच्छा त्याच्या समोर व्यक्त केल्यास त्या पूर्ण होतात अशी लोकांची श्रद्धा आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 27, 2020 09:33 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).