
Vinayaka Chaturthi Wishes in Marathi: हिंदू दिनदर्शिकेत चंद्रोदयात दोन चतुर्थी येतात. तर हिंदू धर्माग्रंथानुसार चतुर्थी तिथीच्या दिवशी गणपतीची पूजा केली जाते. अमावस्यानंतर येणाऱ्या शुल्क पक्षातील चतुर्थीला 'विनायक चतुर्थी' असे म्हणतात. त्याचसोबत पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला 'संकष्टी चतुर्थी' म्हटले जाते.तर आज (12 August) या महिन्यातील विनायक चतुर्थी साजरी करण्यात येणार आहे.
प्रत्येक महिन्यात विनायक चतुर्थीचे व्रत ठेवले जाते. परंतु भाद्रपद महिन्यातील विनायक चतुर्थीला सर्वात जास्त महत्व असते. त्यावेळची चतुर्थी ही गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते. राज्यात सर्वत्र गणेश चतुर्थीच्या दिवशी गणतपतीचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर विनायक चतुर्थीनिमित्त तुमच्यासाठी खास मराठी WhatsApp Messages, SMS, Wishes आणि शुभेच्छापत्र देऊन गणपतीचे स्मरण करा.
Marathi Message and Wishes:
गणपती तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करोत..
तुम्हाला सुख समृद्धी, भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो
हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना...
विनायक चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा !

तव मातेचे आत्मरुप तू
ओंकाराचे पूर्ण रुप तू
कार्यारंभी तुझी अर्चना
विनायका स्वीकार वंदना
विनायक चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा !

|| वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ||
||निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा||
विनायक चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा !

तुझे नाम ओठी, तुझा ध्यास चित्ती
तुझ्या दर्शनाने मिळे आत्मशांती
विनायक चतुर्थी निमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !

चतुर्भुजी मंडित हो,
शोभती आयुथें करी
परशुकमलअंकुश हो,
मोदक पात्र भरी...
विनायक चतुर्थी निमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !

WhatsApp Status:
GIF Images:
विनायक चतुर्थीला 'वरद विनायक' चतुर्थी ही म्हणतात. या दिवशी तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी देण्यात येणाऱ्या आशीर्वादाला 'वरद' असे म्हणतात. तसेच भाविक या दिवशी गणपतीची पूजा करुन उपवास करतात.