Vijay Diwas 2020: 1971 रोजी पाकिस्तानवर भारतीय सेनेने ऐतिसाहिक विजय मिळवल्याने प्रत्येक वर्षी 16 डिसेंबरला 'विजय दिवस' साजरा केला जातो. तर 1971 च्या युद्धात बांग्लादेशाच्या मुक्तीसाठी भारतीय सेनेकडून पाकिस्तानवर विजय मिळवल्याच्या कारणास्तव हा दिवस साजरा केला जातो. तर बांग्लादेशाला याआधी पाकिस्तान म्हणून संबोधले जात होते. याच दिवशी बांग्लादेशात बिजॉय दिबोस साजरा केला जातो. पाकिस्तानच्या विरोधातील युद्धादरम्यान आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शहींदांना या दिवशी श्रद्धांजली वाहिली जाते. 1971 च्या युद्धात भारताने पाकिस्तानला दोन भागात विभागले. त्यामुळे भारताचा हा सर्वात मोठा विजय मानला जातो.
बांग्लादेश जो पूर्व पाकिस्तानाच्या रुपात मानला जात होता तो पाकिस्तानचाच भाग होता. 16 डिसेंबर 1971 दिवशी पूर्व पाकिस्तानला पाकिस्तान पासून आझादी मिळाली. ज्यानंतर तो बांग्लादेश म्हणून अस्तित्वात आला. खरंतर पूर्व पाकिस्तानचे लोक पाकिस्तानी मिलिट्रीच्या अत्याचारांमुळे अत्यंत दु:खी होती. इतिहासकारांच्या मते, पाकिस्तानची सेना पूर्व पाकिस्तान मध्ये लैंगिक शोषण, बलात्कार आणि हत्या सारख्या गोष्टीं घडत असल्याने तेथे भीतीचे वातावरण नागरिकांच्या मनात निर्माण झाले होते.
3 डिसेंबर 1971 मध्ये भारत सरकारने पाकिस्तानच्या विरोधात युद्धाचे रणशिंग फुंकले आणि पाकिस्तानच्या सैन्याचे प्रमुख जनरल अयुब खान यांच्या अत्याचारापासून पूर्व पाकिस्तानला मुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या दोघांमधील हे युद्ध जवळजवळ 13 दिवस सुरु झाल्यानंतर समाप्त झाले. त्यानंतर 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी सेनेने कोणत्याही शर्थीसह आत्मसमर्पण केले.(Constitution Day of India 2020: 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिवस का साजरा केला जातो?)
तर 1971 च्या युद्धादरम्यान फिल्ड मार्शल मानेकशॉ यांच्या नेतृत्वाखालील भारतीय सेनेने पाकिस्तान सेनेवर आपला विजय मिळवला. 16 डिसेंबर 1971 ला 93 हजार सैनिकांसह पाकिस्तानच्या सैन्याने भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केले. हाच भारताचा सर्वाधिक मोठा विजय मानला जातो. पाकिस्तानच्या विरोधातील युद्धा वेळी जवळजवळ 1500 भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. हे शूर जवान शहीद होण्यासह भारतीय सेनेचा ऐतिहासिक विजय याच कारणास्तव जगाच्या नकाशावर बांग्लादेश हा उदयास आला.
दरम्यान, विजय दिवसानिमित्त पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धात शहीद झालेल्या जवानांची आठवण काढत त्यांना श्रद्धांजली दिली जाते. तसेच राजधानी दिल्लीत अमर जवान ज्योतिच्या येथे युद्धातील शहीद जवांना श्रद्धांजली वाहिली जाते. खरंच भारतीय सेनेतील या वीर जवानांची वीरगाथा येणाऱ्या पिढ्यांना प्रेरित करणारी ठरणार आहे.