Constitution Day of India 2020 (Photo Credits: File Image)

Significance of Constitution Day: आज संपूर्ण भारतभर 70 वा 'संविधान दिवस' साजरा केला जाईल. संविधान दिवस हा 'नॅशनल लॉ डे' म्हणूनही ओळखला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान अंमलात आले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा हा खूप महत्त्वाचा दिवस ठरला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. संविधान दिनानिमित्त जाणून घेऊया त्यासंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी: (Constitution Day 2020 Wishes: संविधान दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास Messages, Images, Quotes आणि शुभेच्छापत्रं!)

दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी भारताचा संविधान दिवस साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने आपले संविधान स्वीकाराले असून 26 जानेवारी 1950 रोजी त्याची अंमलबजावणी करण्यात आली. म्हणून तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो. 19 नोव्हेंबर 2015 रोजी भारतीय सरकारने एक पत्रक जारी करत 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. 2015 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची 125 वी जयंती होती. हा दिवस लॉ डे म्हणूनही ओळखला जात होता. याचेच निमित्त साधत 2015 पासून संविधान दिवस साजरा करण्याचे घोषित झाले.

26 नोव्हेंबर म्हणजेच संविधान दिवस हा भारतीय इतिहासाच्या पर्वातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. भारतावरील ब्रिटीशांची सत्ता संपून नव्या भारताचा उदय झाला. भारतीय संविधान बनवण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणीसाठी एकूण 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांचा कालावधी लागला. भारत 1947 मध्ये ब्रिटीश सत्तेतून स्वातंत्र्य झाला. परंतु, भारतीय राज्यघटना प्रस्थापित करण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी लागला. भारतीय संविधाना दिवशी सार्वजनिक सुट्टी जरी नसली तरी सरकारी कार्यालयांमध्ये हा दिवस साजरा केला जातो.

त्याचप्रमाणे शाळा आणि  महाविद्यालयांमध्ये संविधान दिवस साजरा करण्यासाठी संविधानाशी निगडीत वेगवेगळ्या प्रश्नमंजूषा, स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. दरम्यान, यंदा कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालयं पूर्वीप्रमाणे सुरु नाहीत. त्यामुळे यंदा सेलिब्रेशन होणार नसले तरी संविधानविषयी अधिक जाणून घेऊन तुम्ही सजग नागरिक होण्याच्या दिशेने एक पाऊल नक्कीच टाकू शकता.

संविधान हे प्रत्येक देशाच्या बांधणीचा पाया असून देशातील नागरिकांना दिलेले अधिकार आणि त्यांची कर्तव्यं यात नमूद केलेली असतात. संविधान दिनानिमित्त संविधानाविषयी अधिक ज्ञान मिळवून लोकांना त्यांच्या अधिकार आणि कर्तव्याविषयी अधिक जागृत करणे म्हणजे संविधान दिवसाचे खरेखुरे सेलिब्रेशन होय.