आजवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) आयुष्यावर लिहिलेली अनेक पुस्तकं, नाटकं, पोवाडे, यामधून या थोर राजाची कीर्ती केवळ महाराष्ट्रात किंवा देशापुरती मर्यादित नसून जगभर पोहचली आहे.अफझल खानाच्या वधापासून ते आग्र्याहून सुटके पर्यंत स्वराज्य स्थापनेच्या शपथविधीपासून ते रायगडावर घेतलेल्याशेवटच्या श्वासापर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याकडे लहानपणापासून मुलांना शिकवल्या जातात . शिवाजी महाराजांचा जन्म शेकडो वर्षांपूर्वी झाला असला तरी आजही त्यांच्यासाठी प्रत्येकाच्या मनात आदर पाहायला मिळतो.
उद्या म्हणजेच, 6 मे ला महाराजांची तिथीनुसार जयंती आहे, यासाठी मुंबई, ठाणे, कल्याण सह अन्य अनेक ठिकाणी मोठ्या स्तरावर जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यानिमित्ताने या लाडक्या राजाच्या आयुष्याचे काही अज्ञात पैलू जाणून घेऊयात.. Shivaji Jayanti 2019: वैशाख शुद्ध द्वितीया नुसार यंदा कधी साजरी होणार शिव जयंती?
शिवाजी आणि भावंडं
शिवाजी महाराज हे जिजाबाई आणि शहाजी राजांचे दुसरे सुपुत्र होते. शिवाजींचा मोठा भाऊ संभाजी भोसले यांच्या जन्मांनंतर जिजाबाईंना अनेक बाळं गमवावी लागली, त्यानांनंतर शिवाई देवीकडे प्रार्थना केल्यावर त्यांना दुसऱ्यांदा पुत्रप्राप्ती झाली, देवी शिवाइच्या कृपेने झालेल्या या बालकाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. 1654 मध्ये एका लढाईत शिवाजींचा मोठा भाऊ संभाजी महाराज धारातीर्थी पडले, त्यानंतर 1657 मध्ये शिवाजी महाराजांना पुत्र लाभल्यावर त्याचे नाव त्याचा स्वर्गीय काकाकांच्या नावावरून संभाजी असे ठेवण्यात आले.
(Watch Video)
याशिवाय शहाजी महाराजनाच्या दुसऱ्या पत्नी यांचा मुलगा व्यंकोजी महाराज हे शिवाजींचे धाकटे सावत्र बंधू होते. व्यंकोजी यांनी आदिलशहा सुलतानाच्या सैन्यात काम करत आयुष्य घालवले मात्र कधीच शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्याला हातभार लावला नाही याउलट त्यांनी कित्येक लढाया शिवाजींच्या विरुद्ध खेळल्या असल्याचे देखील इतिहासकार सांगतात. आग्र्याहून सुटकेच्या मोहिमेत ज्या हिरोजी फर्जंदाने शिवाजीच्या बनून शत्रुंना चकमा दिला हता तो देखील शिवाजींचा सावत्र भाऊ असल्याचे शेडगावकर घटनावळीत म्हंटले आहे.
शिवाजी महाराजांच्या पत्नी
ऐतिहासिक कथेनुसार महाराजांना आठ पत्नी असल्याचे सांगण्यात येते. त्यातील पहिल्या म्हणजे सईबाई ज्यांच्याशी महाराजांचे सर्वात जवळचे संबंध होते असे मानले जाते, या दोघांचा मुलगा म्हणजे संभाजी महाराज. यापाठोपाठ सोयराबाई, पुतळाबाई, सकवारबाई, सगुणाबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई, व गुणवंतीबाई यांच्याशी महाराजांचा विवाह झाला असल्याचे मानण्यात येते.सोयराबाईंचा आणि शिवाजी महाराजांनाच मुलगा राजाराम महाराज यांना देखील भोस्लेच्या इतिहासात मानाचं स्थान आहे.सईबाईंना दुर्धर आजाराने ग्रासल्यानंतर 1659 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर महाराजांच्या मृत्यूनंतर पुतळाबाईंनी स्वतः सती जाऊन 1680 आपले जीवन संपवून घेतले.
महाराजांचं कीर्तिवान नौदल
मध्यकालीन भारतात मजबूत नौदलाची बांधणी करणारे महाराज पहिले होते. शिवाजींच्या कारकीर्दीत भारताची पश्चिम किनारपट्टी ही ब्रिटिश,डच, पोर्तुगीज, व अब्यासनीज (सिद्दी) यांच्या ताब्यात होती. आपल्याला कोकण किनारपट्टीवर प्रभुत्व प्रस्थापित करून व्यापाराला चालना द्यायची झाल्यास भारी भक्कम नौदलाची स्थापना करणे गरजेचे आहे अशी जाणीव होऊन महाराजांनी नौदलाचा पाया रचण्यास सुरवात केली. १६५८ ला या उभारणीसाठी त्यांनी स्वतः खर्च उचलला व अशा प्रकारे कीर्तीशाली व पहिल्या नौदलाची स्थापना करण्यात आले.
धर्माहून माणुसकी प्यारी
अनेकदा महाराजांचे नाव हिंदू राजा म्हणून घेतले जात असले तरीही महाराजांच्या कामकाजात कमळीचीही धर्मनिरपेक्षता बघायला मिळत होती. महाराजांच्या सैन्यात व अगदी जवळच्या लोकांमध्ये देखील अनेक मुस्लिम बांधवांचा समावेश होता. याशिवाय जरी इंग्रज किंवा परदेशातून आलेल्या सत्तेच्या विरोधात लढत असताना देखील महाराजांनी या धर्माच्या लोकांच्या प्रार्थनास्थळांवर कधीही हल्ले चढवले नाहीत.
शिव जयंती चा सोहळा महाराष्ट्र सोबत गोवा व कर्नाटक या राज्यांमध्ये देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.ढोलाच्या गजरात महाराजांसारखे कपडे घालून आपल्या लाडक्या राजाला मानवंदना दिली जाते.