
नवरात्री (Navratri) निमित्त भाविकांचे श्रद्धास्थान असलेली महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवींची मंदिरे झळाळून निघत असून या मंदिरात नवरात्रौत्सव साजरा करण्यासाठी विशेष तयारी सुरु झाली आहे. किंबहुना ती अंतिम टप्प्यात आली आहे असे म्हणायला हरकत नाही. यात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे (Tuljabhavani Devi) तुळजापूर (Tuljapur) क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. या देवीच्या नवरात्रीतील साज काही औरच असतो. यासाठी लाखो भाविक तुळजापूर भवानी मातेच्या दर्शनासाठी येतात. यंदाही नवरात्रौत्सवानिमित्त येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्राच्या नऊ माळा असल्या तरीही तुळजाभवानीचा उत्सव तसा २१ दिवसांचा असतो. तुळजाभवानी मातेच्या मंदिरात घटस्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेस होत असली तरीही तत्पूर्वी देवीचे धार्मिक उत्सव भाद्रपद वद्य नवमीस सायंकाळपासून सुरू होतात. देवीची प्रत्यक्ष मूर्तीची शेजघरातील निद्रा वद्य नवमीस सायंकाळी सुरू होते. नवरात्रापूर्वी देवीची शेजघरातील निद्रा असते.
येथे पाहा तुळजाभवानीच्या नवरात्रौत्सवाचे संपुर्ण वेळापत्रक:

श्री तुळजाभवानी देवीची मुर्ती चल मुर्ती आहे. येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी देवीच्या मुर्तीची पालखीत बसवून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते. वर्षातून एकूण तीन वेळा मुर्ती सिंहासनावरून हलवून गाभार्याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते. नंतर विजयादशमीच्या दिवशी सिमोल्लंघनाच्या वेळी आईची पालखीतून मिरवणूक काढली जाते. देवीच्या पालखीसोबत श्रीयंत्र, खंडोबा आणि महादेवाची मिरवणूकही निघते.
हेदेखील वाचा- Tembhi Naka Devi 2019: ठाण्याच्या 'दुर्गेश्वरी देवी' चा यंदाच्या शारदीय नवरात्र उत्सवाचं पहा संपूर्ण वेळापत्रक
नवरात्रीच्या काळात भक्त राज्यभरातून ठिकठिकाणांहून पायी पालख्या घेऊन येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी चरणी अर्पण केलेली सोन्याच्या पुतळ्याची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारांपैकी एक आहे. श्री तुळजाभवानी ही आदिशक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे.