Tembhi Naka Devi 2019: ठाण्याच्या 'दुर्गेश्वरी देवी' चा यंदाच्या शारदीय नवरात्र उत्सवाचं पहा संपूर्ण वेळापत्रक
Thanyachi Durgedurgeshwari (Photo Credits: Instagram)

Tembhi Naka Devi 2019 Schedule:  मुंबईमध्ये जसं गणेशोत्सवादरम्यान भव्य गणेशमूर्तींचं आकर्षण असतं तशीच धूम नवरात्रीदारम्यान असते. प्रामुख्याने ठाण्यात टेंभीनाका (Tembhi Naka) परिसरात 'दुर्गेश्वरी' (Durgedurgeshwari) देवीचं रूप, मोहक मूर्ती पाहण्यासाठी भाविक खास हजेरी लावतात. यंदा हा नवरात्रोत्सव 29 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. नऊ रात्र आणि दहा दिवस देवीचा जागर केला जातो. त्यामुळे तुम्हांलाही यंदा नवरात्रीदरम्यान ठाण्याच्या या देवीच्या मंडळाला भेट द्यायची असेल तर पहा यंदा नवरात्रीमध्ये घटस्थापना (Ghatasthapana) म्हणजे 29 सप्टेंबर पासून दसरा 8 ऑक्टोबर पर्यंत देवीच्या मंडळामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यामध्ये भोंडला, कन्यापूजन, हळदी कुंकू आणि पूजा अशा कार्यक्रमांची रेलचेल असते. Navratri 2019: शारदीय नवरात्रीमध्ये घटस्थापना कधी कराल? पहा देवीची नऊ रूप आणि तिच्या पूजेचं नवरात्रोत्सवातील वेळापत्रक

ठाण्याची दुर्गेश्वरी देवी ही नवसाला पावणारी, हाकेला धावणारी, लोकांच्या आयुष्यातील विघ्ने दूर करणारी म्हणून ओळखली जाते. देवीच्या चेहेर्‍यावरील तेज, सोज्वळ भाव, हास्य आणि मोहक रुप पाहण्यासाठी अनेक भाविक गर्दी करतात. Kanya Pujan 2019 Date: शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गाष्टमी दिवशी कन्या पूजन करण्याचं महत्त्व, शुभ वेळ काय?

नवरात्री 2019 दरम्यान ठाण्याच्या दुर्गेश्वरी देवीचा कसा असेल कार्यक्रम ?

  • देवीची आगमन मिरवणूक: 29 सप्टेंबर 2019 वेळ:सकाळी 11 वाजता
  • देवीची प्राणप्रतिष्ठा: 29 सप्टेंबर 2019 वेळ:सांयकाळी 6 वाजता
  • सामुदायिक अभिषेक : 30 सप्टेंबर 2019 ते 8 ऑक्टोबर 2019 वेळ:सकाळी 8 -10 वाजता
  • रोज होणारी पूजा-आरती: वेळ - सकाळी 11 वाजाता,सांयकाळी 7 आणि रात्री 12 वाजता
  • महाभोंडला/कन्यापूजन/हळदी कुंकू: 2 ऑक्टोबर 2019 ललितापंचमी रोजी सांयकाळी7 वाजता स्थळ:टाउन हॉल, भवानी चौक, टेंभी नाका, ठाणे.
  • अष्टमीची महाआरती: 6 ऑक्टोबर 2019 वेळ:सांयकाळी 9 वाजता
  • भजन: रोज सांयकाळी 7-9 वाजता
  • होम लोककल्याण होम: 8 ऑक्टोबर 2019 वेळ:सकाळी 10 वाजता
  • उत्तरपूजा विसर्जन मिरवणूक: 8 ऑक्टोबर 2019 वेळ:सांयकाळी 6 वाजता

देवीच्या मंडपामध्ये कुमारीकांकडून तिचे पूजन केले जाते. पुढे षोडोपचार पूजा केल्यानंतर नऊ रात्र आणि दहा दिवस भाविकांना दर्शन देण्यासाठी सज्ज होते. नऊ दिवसात प्रत्येक तिथीच्या वेगवेगळ्या रुपाप्रमाणे देवीची पूजा करण्याची प्रथा आहे.