Sharad Navratri Kanya Pujan 2019 : आज दुर्गाष्टमीच्या दिवशी देशभरात देवीचा जागर करण्यासाठी भक्तांची गर्दी पहायला मिळाली आहे. या काळामध्ये आदिशक्तीचा गौरव केला केला जातो. हिंदू धर्मीय या नवरात्रीमध्ये कन्या किंवा कुमारिका पुजन करतात. अश्विन शुक्ल सप्तमी, अष्टमी या दिवशी नऊ कुमारिकांचे पूजन केले जाते. यंदा नवरात्रीमध्ये सप्तमी ( 5 ऑक्टोबर) तर अष्टमी (6 ऑक्टोबर) दिवशी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे तुमच्या सोयीनुसार या दिवशी सकाळी नऊ कुमारिका, बालिकांचं पूजन करून त्यांना जेवण आणि भेटवस्तू देऊन नवरात्रीमध्ये कन्यापूजन (Kanya Pujan) करण्याचा रिवाज आहे. Navratri 2019: मुंबादेवी मंदिरासह देशभर देवीच्या मंदिरात आज 'दुर्गाष्टमी' चा उत्सव
नवरात्री मध्ये नऊ देवीची रूप म्हणून नऊ बालिकांचं पूजन केलं जातं. देवीला प्रसन्न करण्याचा एक मार्ग म्हणून हे बालिका पूजन केलं जातं. सामान्यपणे 2 ते 10 वर्षाच्या मुलींची निवड करून त्यांची पूजा केली जाते. या चिमुकल्यांचं पाद्यपूजन करून त्यांना प्रसाद, दक्षिणा आणि भेटवस्तू दिली जाते. Navratri 2019: शारदीय नवरात्रीमध्ये घटस्थापना कधी कराल? पहा देवीची नऊ रूप आणि तिच्या पूजेचं नवरात्रोत्सवातील वेळापत्रक
कसं कराल कन्या पूजन?
- कन्या पूजनासाठी बालिका, कुमारिका घरी आल्यानंतर त्यांचे पाय धुऊन कोरडे करा.
- या मुलींना हळद, कुंकू लावून त्यांची पूजा करा.
- त्यानंतर विशिष्ट रक्कमेची दक्षिणा द्या.
- मुलींना पुरी- भाजी आणि गोडाचा पदार्थ असा प्रसाद द्या.
- त्यानंतर साजशृंगारातील एखादी वस्तू भेट म्हणून द्या.
नऊ बालिका कशाचं रूप असतात?
दोन वर्षाची 'कुमारिका' असते तिच्या पूजनाने दारिद्र्य दूर होतं.
तीन वर्षाची 'त्रिमूर्ती' असते. तिच्या पूजनाने सुख-समृद्धी नांदते.
चार वर्षाची मुलगी 'कल्याणी' असते. तिच्या पूजनाने घरात कल्याण होतं.
पाच वर्षाची मुलगी 'रोहिणी' रूपात असते. तिच्या पूजनाने तुम्ही रोगमुक्त राहता.
सहा वर्षाची मुलगी 'कालिका' रूपात असते.तिच्या पूजनाने राजयोग प्राप्ती होते.
सात वर्षाची मुलगी 'चंडिका' या रूपात असते. तिच्या पूजनाने ऐश्वर्य येते.
आठ वर्षाची मुलगी 'शांभवी' रूपात असते. तिच्या पूजनाने तुम्ही विजयी होता.
नऊ वर्षाची मुलगी 'दुर्गा देवी'च्या रूपात असते. तिच्या पूजनाने शत्रूंचा नाश होण्यास मदत होते.
दहा वर्षाची मुलगी सुभद्रा रूपात असते तिच्या पूजनाने सर्व इच्छा पूर्ण होतात.
नवरात्रीमध्ये अष्टमीच्या दिवसाला विशेष महत्त्व असते. त्यामुळे या दिवशी अनेक घरांमध्ये बालिका पूजन केले जाते. कन्या पूजनात एका कुमाराचेदेखील पूजन करण्याची काही ठिकाणी प्रथा आहे.
(टीप- हा लेख प्राप्त माहितीनुसार लिहिण्यात आला आहे, याचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही तसेच लेटेस्टली मराठी याची कोणतीही पुष्टी करत नाही)