Lord Durga (Photo Credits-Facebook)

शारदीय नवरात्रौत्सव येत्या 29 सप्टेंबरपासून सुरु होणार असून 9 दिवसापर्यंत ती साजरी करण्यात येणार आहे. या 9 दिवसात अंबे मातेची पूजा केली जाते. त्याचसोबत देवीच्या नऊ रुपांची उपासना ही नवरात्रौत्सवावेळी केल्याने त्याचे फळ आयुष्यात जरुर मिळते अशी लोकांमध्ये मान्यता आहे. तसेच नवरात्रौत्सवादरम्यान नऊ रंग परिधान केले जातात.

नवरात्र हा अत्यंत महत्वाचा कुलधर्म असून तो सर्वांकडे कटाक्षाने पाळला गेला पाहिजे.आपण देवघरात रोज पूजा करत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिक अधिक प्रभावी व्हावे, त्याचे आपल्या घरावर कृपाछत्र असावे, व अदृष्ट शक्तींपासून कुळास संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र सांगितले आहे. तर जाणून घ्या देवीच्या नऊ रुपांसाठी 'या' मंत्रांचा जप केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

-देवी शैलपुत्री – नवरात्रीचा पहिला दिवस

ॐ देवी शैलपुत्र्यै नमः॥

या देवी सर्वभूतेषु माँ शैलपुत्री रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:॥

-देवी ब्रह्मचारिणी- नवरात्रीचा दुसरा दिवस

ॐ देवी ब्रह्मचारिणी नमः॥

या देवी सर्वभूतेषु माँ ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।

-देवी चंद्रघण्टा - नवरात्रीचा तीसरा दिवस

ॐ देवी चन्द्रघण्टायै नमः॥

या देवी सर्वभूतेषु माँ चन्द्रघण्टा रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

-देवी कुष्माण्डा- नवरात्रीचा चौथा दिवस

ॐ देवी कूष्माण्डायै नमः॥

या देवी सर्वभूतेषु माँ कूष्माण्डा रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

-देवी स्कंदमाता- नवरात्रीचा पाचवा दिवस

ॐ देवी स्कन्दमातायै नमः॥

या देवी सर्वभूतेषु माँ स्कन्दमाता रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

-देवी कात्यायनी- नवरात्रीचा सहावा दिवस

ॐ देवी कात्यायन्यै नमः॥

या देवी सर्वभूतेषु माँ कात्यायनी रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

-देवी कालरात्रि- नवरात्रीचा सातवा दिवस

ॐ देवी कालरात्र्यै नमः॥

या देवी सर्वभूतेषु माँ कालरात्रि रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

-देवी महागौरी- नवरात्रीचा आठवा दिवस

ॐ देवी महागौर्यै नमः॥

या देवी सर्वभूतेषु माँ महागौरी रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

-देवी सिद्धिदात्री- नवरात्रीचा नववा दिवस

ॐ देवी सिद्धिदात्र्यै नमः॥

या देवी सर्वभूतेषु माँ सिद्धिदात्री रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

(Navratri 2019: नवरात्रीचे उपवास करत आहात, चुकूनही करू नका ह्या 13 गोष्टी)

तर नवरात्रौत्सवावेळी काहीजण निर्जळी उपास ठेवतात. तर काहीजण देवीमातेच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास ठेवतात. परंतु देवीमातेचा उपवास आणि तिची पूजा कटाकाक्षाने करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे देवीमातेच्या पूजेत कोणतीही चूक झाल्यास त्याचे वाईट परिणाम आयुष्यात दिसून येतात असे ही काही जण मानतात.

(टीप- हा लेख प्राप्त माहितीनुसार लिहिण्यात आला आहे, याचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही तसेच लेटेस्टली मराठी याची कोणतीही पुष्टी करत नाही)