Navratri 2019 (File Photo)

नवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करणे हा जितका लोकांसाठी महत्वाचा भाग असतो तितकाच नवरात्रीचे उपवास (Navratri Fast) करणे हा लोकांच्या श्रद्धेचा भाग असतो. नवरात्रीचे उपवास करणे हे जरी देवीची उपासना करण्यासाठी किंवा फलप्राप्ती असतात असे म्हटले जात असले तरीही शास्त्रीयदृष्ट्या याला फार महत्व आहे. हा काळ ऋतुबदलाचा मानला जातो. त्यामुळे या दिवसात शरीराची प्रतिकारशक्ती आणि पचनशक्ती कमी होते. हिंदू धर्मात उपवासाचे महत्त्व आहे. त्यामुळे हे उपावस केल्याने कवेळ भक्तीचे प्रदर्शन होत नसून हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

नवरात्रीत 9 दिवस उपवास करणे हे वाटते तितके सोपे काम नाही. काही लोक तर 1 दिवसाच्या उपवासात पण अनेक चुका करतात हे तर 9 दिवस उपवास करावे लागतात. त्यामुळे या उपवासाचे पावित्र्य जपण्यासाठी पुढे दिलेल्या 13 गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.

1. व्रत ठेवणार्‍यांनी या दिवसांत दाढी-मिश्या आणि केस कापू नये.

2. नऊ दिवसांपर्यंत नखं कापणे देखील कटाक्षाने टाळावे.

3. जर अखंड ज्योती लावली असेल तर या दिवसांमध्ये घराला रिकामे सोडून जाऊ नये.

4. खाण्यात कांदे, लसूण आणि मांसाहार टाळावे.

5. नऊ दिवसांचा उपास ठेवणार्‍यांनी अस्वच्छ कपडे आणि न धुतलेले कपडे परिधान करू नये.

6. व्रत ठेवणार्‍या लोकांना बेल्ट, चप्पल जोडे, बॅग यांसारख्या चामड्याच्या वस्तूंचा वापर करू नये.

7. व्रत ठेवणार्‍यांनी नऊ दिवस लिंबू कापू नये.

8. उपासात नऊ दिवसांपर्यंत भोजनात मीठाचे सेवन करू नये

9. विष्णू पुराणानुसार, नवरात्री व्रताच्या वेळेस दिवसा झोपणे निषेध आहे.

10. फलाहार एकाच जागेवर बसून केले पाहिजे.

11. चालीसा, मंत्र किंवा सप्तशतीचे पठण करत असाल तर मध्येच दुसरी गोष्ट बोलणे किंवा उठण्याची चूक करू नये.

12. बरेच लोक भूक भागवण्यासाठी तंबाखूचे सेवन करतात ही चूक उपासादरम्यान करू नये.

13. या दिवसात शारीरिक संबंध स्थापित केल्याने व्रताचे योग्य फळ मिळत नाही.

हेही  वाचा- Navratri 2019 Colors Importance: नवरात्रीत का दिले जाते रंगांना महत्व, जाणून घ्या यंदाच्या नवरंगाचे महत्व

नवरात्रीत नऊ दिवसांचे व्रत हे खूपच पवित्र आणि महत्वाचे मानले जाते. त्यामुळे शक्यतो हे 9 दिवसांचे व्रत शारीरिकदृष्ट्या करणे झेपत असेल तरच करा अन्यथा करु नये असे पुराणात म्हटले आहे.

(टीप- हा लेख प्राप्त माहितीनुसार लिहिण्यात आला आहे, याचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही तसेच लेटेस्टली मराठी याची कोणतीही पुष्टी करत नाही)