Durgashtami 2019: आज शारदीय नवरात्री मधील अष्टमीचा दिवस आहे. दुर्गाष्टमी म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून दशमीपर्यंत साजरी केली जाणारी नवरात्र आदिशक्तीचा जागर करण्यासाठी असते. सृष्टीतील नवशक्तीचा याच्या माध्यमातून पूजा करण्याची प्रथा आहे. आज दुर्गाष्टमीचं औचित्य साधून मुंबई सह देशभरातील देवीची मंदिरं सजली आहे. दक्षिण मुंबईतील 'मुंबादेवी' मंदिरातही (Shree Mumbadevi Temple) आज सकाळी काकड आरतीच्या दरम्यान मोठी गर्दी पहायला मिळाली.
दुर्गाष्टमी दिवशी दुर्गेचे आठवे रूप महागौरीच्या स्वरूपात देवीची आराधना केली जाते. धन संपत्ती यांच्या वृद्धीसाठी भाविक आज देवीचं दर्शन घेऊन तिची मनोकामे पूजा-कामना करतात. Kanya Pujan 2019 Date: शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गाष्टमी दिवशी कन्या पूजन करण्याचं महत्त्व, शुभ वेळ काय?
मुंबादेवीच्या काकड आरती वेळेसची दृश्य
Maharashtra: Kakad Aarti held at Shree Mumbadevi Temple in Mumbai, this morning. #Navratri pic.twitter.com/UgrO0LCi5D
— ANI (@ANI) October 6, 2019
दुर्गाष्टमी दिवशी अनेक घरांमध्ये स्त्रिया कन्या पूजनदेखील करतात. 2 ते 10 वर्षाच्या चिमुकल्यांचं आजच्या दिवशी देवीचं रूप मानून पूजा केली जाते. त्यांना भेटवस्तू आणि शिरा-पुरीचा प्रसाद दिला जातो.