Navratri 2019: शारदीय नवरात्रीमध्ये घटस्थापना कधी कराल? पहा देवीची नऊ रूप आणि तिच्या पूजेचं नवरात्रोत्सवातील वेळापत्रक
Lord Durga (Photo Credits-Facebook)

हिंदू धर्मानुसार नवारात्रीच्या (Navratri) सणाला फार महत्व आहे, हिंदू पंचांगानुसार यंदा शारदीय नवरात्री 29 सप्टेंबर पासून सुरु होणार असून 7 ऑक्टोंबरला संपणार आहे. या संपूर्ण नऊ दिवसांत देवीमातेची मनोभावे पूजा केली जाते. तर 8 ऑक्टोंबर रोजी धूमधामसह विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा करण्यात येणार आहे. त्याचसोबत विजयादशमीच्या दिवशी देवीमातेचे विसर्जन करण्यात येणार आहे. (Navratri Colours 2019: यंदा नवरात्रीचे नऊ रंग कोणते? पहा शारदीय नवरात्रीचं संपूर्ण वेळापत्रक)

यंदा नवरात्रौत्सवासाठी घट 29 सप्टेंबर रोजी बसणार आहेत. तर शास्रांनुसार, देवीमातेची नऊ रुपे अत्यंत महत्वाची मानली जातात. त्यामुळे नवरातौत्सवादरम्यान नऊ दिवस देवीमातेच्या विविध नऊ रुपांची पूजा केली जाते. तसेच काहीजण निर्जळी उपास सुद्धा ठेवतात. तर काहीजण देवीमातेच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास ठेवतात. परंतु देवीमातेचा उपवास आणि तिची पूजा कटाकाक्षाने करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे देवीमातेच्या पूजेत कोणतीही चूक झाल्यास त्याचे वाईट परिणाम आयुष्यात दिसून येतात असे ही काही जण मानतात. त्यामुळे देवीमातेचा नवरात्रौत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्सहाने साजरा करण्यात येतो. तर जाणून 'या' तारखांच्या दिवशी देवीमातेच्या 9 रुपांची पूजा करण्यात येणार आहे.

-29 सप्टेंबर: प्रतिपदा, नवारात्रौत्सवाचा पहिला दिवस- घटस्थापना/शैलीपूत्री पूजा

-30 सप्टेंबर: द्वितीया/नवरात्रौत्सवाचा दुसरा दिवस-ब्रम्हचारिणी पूजा

-1 ऑक्टोंबर: तृतीया/नवरात्रौत्सवाचा तिसरा दिवस-चंद्रघंटा पूजा

-2 ऑक्टोंबर: चतुर्थी/नवरात्रौत्सवाचा चौथा दिवस-कुष्मांडा पूजा

-3 ऑक्टोंबर: पंचमी/नवरात्रौत्सवाचा पाचवा दिवस-सरस्वती पूजा, स्कंदमाता पूजा

-4 ऑक्टोंबर: पष्ठी/ नवरात्रौत्सवाचा सहावा दिवस- कात्यायनी पूजा

-5 ऑक्टोंबर: सप्तमी/ नवरात्रौत्सवाचा सातवा दिवस-कालरात्री, सरस्वती पूजा

-6 ऑक्टोंबर: अष्टमी/नवरात्रौत्सवाचा आठवा दिवस- महागौरी, दुर्गाष्टमी, नवमी पूजन

-7 ऑक्टोंबर: नवमी/ नवरात्रौत्सवाचा नववा दिवस- नवमी हवन, नवरात्री पारायण

-8 ऑक्टोंबर: देवीमातेचे विसर्जन, विजयादशमी

 

तसेच स्त्री शक्तीचा जागर समानतेमधून करण्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये सार्‍या महिला प्रत्येक दिवशी एक विशिष्ट रंग परिधान करतात. स्त्रीयांमधील एकता एका अनोख्या पद्धतीने समोर आणण्यसाठी असलेली ही चलाखी आता फॅशन स्टेटमेंट झाली आहे. घटस्थापनेपूर्वीच अनेक महिला नवरात्रीच्या नऊ रंगांप्रमाणे कपड्यांची तयारी करून ठेवतात.