Shivaji Maharaj Jayanti (Photo Credits: Wikimedia Commons)

Shiv Jayanti 2019: महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) केली. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी मूठभर मावळ्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं. आजही छत्रपतींचा इतिहास आबालवृद्धांना प्रेरणा देऊन जातो. पण अशा या पराक्रमी राजाच्या जन्म तिथी बाबत जाणकारांमध्ये मतमतांतरं आहेत.  शिवरायांची जन्म तारीख काय आणि शिवजयंती (Shiv Jayanti) कधी साजरी करावी याबाबत शिवभक्तांमध्येही दोन गट आहेत. Shivaji Maharaj Jayanti 2019: शिवजयंती विशेष WhatsApp Status, Quotes, Wishes,Messages आणि शुभेच्छापत्र!

शिवजयंती नेमकी कोणत्या दिवशी ?

इंग्रजी कॅलेंडर नुसार शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली झाला असं मानलं जातं. तर हिंदू कॅलेंडरनुसार शिवारायांच्या जन्माची तिथी फाल्गुन वद्य तृतीया आहे. त्यामुळे ही तिथी ज्या दिवशी असेल तो इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे दरवर्षी जी तारीख येईल तो दिवस शिव जयंती म्हणून साजरा करावा अशी मागणी होऊ लागली. शिव जयंती हा दिवस शिवाजी महाराजांचा जन्म दिवस, त्यामुळे 2001 सालापासून याबाबतच्या विविध मतांचा विचार करून शासनाकडून अधिकृतरित्या दरवर्षी 19 फेब्रुवारी हा दिवस शिवजयंती म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा केली.

का साजरी केली जाते शिवजयंती ?

शिवजयंती हा दिवस सणाच्या स्वरूपात साजरी कराण्याची संकल्पना लोकमान्य टिळकांची आहे. इंग्रजांविरुद्ध भारतीयांना समाज प्रबोधनातून काही गोष्टी सांगण्यासाठी, त्यांना सार्वजनिकरित्या एकत्र जमून सण साजरा करता यावा म्हणून शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि एकत्ररित्या सार्वजनिक सणाच्या स्वरूपात साजरी करण्याला सुरुवात झाली.

शिवजयंती कशी साजरी केली जाते?

शिवजयंती हा शिवाजी महाराजांचा जन्मदिवस असल्याने त्याचा महाराष्ट्रभर उत्साह असतो. शालेय स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जातं. शाहिरांच्या पोवाड्यापासून अगदी भाषणांपर्यंत विविध माध्यमातून शिवरायांची महाती वर्णिली जाते. शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा संपन्न होतो. (  नक्की वाचा : Shivaji Maharaj Jayanti 2019: छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणते गुण तुम्ही पुढील पीढीला द्याल?)

शिवजयंती हा सण केवळ एका शसकीय सुट्टीचा दिवस म्हणून मर्यादीत न ठेवता या दिवसाचं भान ठेवून शिवरायांच्या गुणांचा, परक्रमाचा वारसा पुढे घेऊन जाणंदेखील गरजेचे आहे. त्यासाठी शक्य असेल त्या माध्यामातून शिवाजी महाराजांचे विचार पुढे घेऊन जाणं ही आपली जबाबदारी आहे.