Shiv Jayanti 2019 Wishes: शिवजयंती विशेष शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp Status, Quotes, Wishes, Messages आणि मराठी शुभेच्छापत्र!
Shiv Jayanti 2019 Wishes (Photo Credits: File Photo)

Shivaji Maharaj Jayanti 2019 Marathi Wishes:   शिवजयंती तारखेनुसार साजरी करावी की तिथीनुसार हा वाद गेल्या अनेक काळापासून महाराष्ट्रामध्ये रंगतो आहे. महाराष्ट्र सरकारकडून 2001 साली फाल्गुन वद्य तृतीया (Phalguna vadya Tritiya)  शके 1551 (शुक्रवार, 19 फेब्रुवारी 1630) हा दिवस शिवाजी महाराजांचा जन्मदिवस म्हणून स्वीकारण्यात आला. त्यामुळे तारखे नुसार 19 फेब्रुवारी दिवशी 'शासकीय सुट्टी' देऊन शिवजयंती (Shiv Jayanti)  साजरी केली असली तरीही तिथीनुसार यंदा 23 मार्च 2019 दिवशी शिवजयंती सोहळा रंगणार आहे. मराठी पंचांगानुसार फाल्गुन वद्य तृतीया ही तिथी यंदा 23 मार्च दिवशी आहे.  इंग्रजी आणि मराठी दिनदर्शिकेमध्ये तारीख, महिना, वेळ परत्वे हा दिवस जरी वेगळा असला तरीही आजही त्यांच्या पराक्रमाच्या, शौर्याच्या कथा नव्या पिढीला प्रेरणा देतात. हा शिवरायांच्या पराक्रमाचा वसा शिवजयंती दिवशी पुढच्या पिढीला देण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करणं आवश्यक आहे. म्हणूनच किमान शिवजयंती दिवशी मेसेजच्या स्वरूपात त्यांचे विचार पसरवण्यासाठी शिवजयंती विशेष मेसेज (Shiv Jayanti Messages), ग्रिटिंग्स, व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस (Shiv Jayanti WhatsApp Status)  देऊन तुम्ही आजच्या दिवशी शिवजयंती साजरी करणार असलात ते हे खास मेसेज तुमच्यासाठी ... Shiv Jayanti 2019: शिवजयंती शुभेच्छा देणारी खास मराठमोळी व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स

शिवजयंतीच्या शुभेच्छा  

 

शिवजयंती विशेष मेसेज

अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी,

उधळण होईल भगव्या रक्ताची,

आणि फाडली जरी आमची छाती,

तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची…

जय शिवराय!

शिवजयंतीच्या शुभेच्छा!

Shiv Jayanti 2019 Wishes
Shiv Jayanti 2019 Wishes (File Photo)

जिथे शिवभक्त उभे राहतात

तिथे बंद पडते भल्या भल्याची मती...

अरे मरणाची कुणाला भीती

आदर्श आमचे राजे शिव छत्रपती…

जय शिवराय

शिवजयंतीच्या शुभेच्छा!

Shiv Jayanti 2019 Wishes
Shiv Jayanti 2019 Wishes (Photo Credits: File Photo)

प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले,

दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले,

धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी,

हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी…!

शिवजयंतीच्या शुभेच्छा!

Shiv Jayanti 2019 Wishes
Shiv Jayanti 2019 Wishes (Photo Credits: File Photo)

छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,

त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,

प :- परत न फिरणारे,

ति :- तिन्ही जगात जाणणारे,

शि :- शिस्तप्रिय,

वा :- वाणिज तेज,

जी :- जीजाऊचे पुत्र,

म :- महाराष्ट्राची शान,

हा :- हार न मानणारे,

रा :- राज्याचे हितचिंतक,

ज :- जनतेचा राजा.

शिवजयंतीच्या शुभेच्छा!

shiv Jayanti 2019 Wishes
Shiv Jayanti 2019 Wishes (Photo Credits: File Photo)

“ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,

“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,

“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,

“जय शिवराय” बोलल्याने

आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते…

शिवजयंतीच्या शुभेच्छा!

Shiv Jayanti 2019 Wishes
Shiv Jayanti 2019 Wishes (Photo Credits: File Photo)

शिवजयंती 2019 विशेष व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स   

शिवजयंती 2019 व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स

शिवजयंती 2019 व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स

शिवजयंती आणि तारखेचा वाद

शिव जन्मदिवस 19 फेब्रुवारी 1630 आहे असे एका गटाचे मत आहे. तर दुसरा गट 6 एप्रिल 1627 हा जन्मदिवस असल्याचा दावा करत होते. परंतू इतिहास जाणकार, पंचागकर्ते, अभ्यासक यांच्या अहवालातून पुढे आलेल्या गोष्टींनुसार शिवजयंती फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 (शुक्रवार,19 फेब्रुवारी 1630) दिवशीच शिवजयंती साजरी केली जाते. शिवजयंती हा दिवस महराष्ट्रात राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांनी समाजातील लोकांना एकत्र आणण्यासाठी शिवजयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. मात्र कालांतराने तारखेवरून वाद रंगला. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या मते, शिव काळात इंग्रजी कॅलेंडरच नव्हते त्यामुळे मराठी दिनदर्शिकेनुसारच शिवजयंतीचा उत्सव साजरा करावा. आपण इतर सण आपल्या मराठी महिन्यांनुसार साजरं करतो त्यामुळे शिवजयंतीचा सोहळा देखील तसाच साजरा व्हावा. या दिवशी शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर जेथे शिवरायांचा जन्म झाला त्या ठिकाणाला भेट देऊन आदरांजली अर्पण करतात.

मग यंदा शिवजयंतीचं औचित्य साधून तुम्ही कोणत्या स्वरूपात शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताय ते आम्हांला नक्की कळवा.