Shivaji Maharaj Jayanti 2020 Marathi Messages: महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्या छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा 390 वी जयंती 19 फेब्रुवारी दिवशी साजरी केली जाणार आहे. यंदा शिवाजयंतीचं (Shiv Jayanti) औचित्य साधून शिवनेरी पासून महाराष्ट्रासह देशा-परदेशामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मग डिजिटल माध्यमांच्या आजच्या युगामध्ये शिवभक्तांना रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) फेसबूक, व्हॉटसअॅप स्टेट्स आणि मेसेजेस यांच्या माध्यमातून शेअर करा. यासाठी आम्ही तयार केलेले हे काही शिवजयंती स्पेशल मराठमोळे संदेश, Wishes, Greetings, या स्वरूपात तुमच्या नातेवाईक, प्रियजन, मित्रपरिवार या सर्वांना शुभेच्छा देऊन तुम्ही आजचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मसोहळा साजरा करू शकाल. शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) हे अखंड भारताचेच नव्हे तर जगभरात गाजलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांचे शौर्य, चातुर्य, पराक्रम हे जगभरात महानतेचे प्रमाण आहेत हा शिवरायांच्या पराक्रमाचा वसा शिवजयंती दिवशी पुढच्या पिढीला देण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करणं आवश्यक आहे. Shiv Jayanti 2020 Status: शिव जयंती उत्सवापूर्वीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत हे Tik Tok Videos.
शिव जयंती 2020 शुभेच्छा
1) इतिहासाच्या पानावर
रयते च्या मनावर
मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा शिवछत्रपती
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
2) निश्चयाचा महामेरु,|
बहुत जनांसी आधारु|
अखंड स्थितीचा निर्धारु|
श्रीमंत योगी||
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
||जय भवानी || जय शिवाजी ||
3) ताठ होतील माना, उंच होतील नजरा,
त्या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा
बघतोस काय मुजरा कर
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
4) यशवंत,
किर्तीवंत,
सामर्थ्यवंत,
वरदवंत,
पुण्यवंत,
नीतीवंत
जाणता राजा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा!
5) श्वासात रोखूनी वादळ,
डोळ्यांत रोखली आग,
देव आमचा छत्रपती,
एकटा मराठी वाघ…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
असं म्हणतात की मोठ्या आयुष्यापेक्षा थोर आयुष्य कधी उत्तम, छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनही असेच म्हणता येईल. रयतेचा राजा म्हणून लोकांच्या मनामनात छत्रपतींनी अधिराज्य गाजवले आहे. अशा शिवरायांना कधीच विसरता येणार नाही. यंदा शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासोबतच त्यांचा आदर्श, त्यांचे विचार शिकवण आत्मसात केल्यास तीच त्यांच्यासाठी खरी मानवंदना ठरेल.