Shivaji Maharaj Jayanti 2019 Tithi Wishes: शिवजयंती (Shiv Jayanti) तारखेनुसार 19 फेब्रुवारी दिवशी साजरी केली जाते तर तिथीनुसार हा सण फाल्गुन वद्य तृतीया (Phalguna vadya Tritiya) या दिवशी साजरी केली जाते. यंदा तिथीनुसार शिवजयंती 23 मार्च 2019 दिवशी साजरी केली जाणार आहे. मग तुम्हांलाही शिवभक्तांना शिवजयंती शुभेच्छा (Shiv Jayanti Wishes) द्यायच्या असतील तर हे मेसेजेस शेअर करून नक्की शिवजयंतीचा उत्साह वाढवू शकता आजकाल डिजिटल मीडियाच्या युगात लोक व्हॉट्सअॅप, फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून मेसेज देतात. काही महिन्यांपूर्वी व्हॉट्स स्टिकर्स (WhatsApp Stickers) चं फिचर सुरु करण्यात आलं आहे. मग पहा शिवजयंतीच्या शुभेच्छा व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या माध्यमातून कशा द्याल?
शिवजयंतीच्या शुभेच्छा
शिवजयंती विशेष व्हॉट्सअॅप स्टिकर्स
- WhatsApp ओपन करा त्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या चॅट विंडोमध्ये जा.
- खालच्या बाजूला तुम्हाला इमोटीकॉन्सच्या बाजूला व्हॉट्सअॅप स्टिकर्सचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
- उजव्या कोपऱ्यात + साईनवर क्लिक करा.
- सर्वात खाली Get More Stickers चा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हांला गुगल प्ले स्टोअरची लिंक ओपन झालेली दिसेल.
- त्यानंतर शिवजयंती किंवा शिवाजी महाराज स्टिकर्स असं टाईप करा. तुम्हाला अनेक स्टिकर्सचे सेट्स दिसतील.
- तुम्हांला आवडेल ते स्टिकर्स पॅक निवडा आणि Add To whatsapp वर क्लिक करा. तुमच्या व्हॉट्सअॅप मध्ये शिवजयंतीचे स्टिकर्स आले असतील.
थेट http://bit.ly/ShivJayantiWAStickers या लिंक वर क्लिक करून देखील तुम्ही शिवजयंतीचे स्टिकर्स मिळवू शकता.
आता तुम्ही थेट तुमच्या मित्रपरिवारात थेट शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता. शिवजयंती विशेष शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp Status, Quotes, Wishes,Messages आणि शुभेच्छापत्र! देखील शेअर करून शुभेछा देऊ शकता.
महाराष्ट्र सरकारकडून 2001 साली फाल्गुन वद्य तृतीया (Phalguna vadya Tritiya) शके 1551 (शुक्रवार, 19 फेब्रुवारी 1630) हा दिवस शिवाजी महाराजांचा जन्मदिवस म्हणून स्वीकारण्यात आला. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या मते, शिव काळात इंग्रजी कॅलेंडरच नव्हते त्यामुळे मराठी दिनदर्शिकेनुसारच शिवजयंतीचा उत्सव साजरा करावा. आपण इतर सण आपल्या मराठी महिन्यांनुसार साजरं करतो त्यामुळे शिवजयंतीचा सोहळा देखील तसाच साजरा व्हावा. या दिवशी शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर जेथे शिवरायांचा जन्म झाला त्या ठिकाणाला भेट देऊन आदरांजली अर्पण करतात.