Shiv Jayanti Tithi 2020 (File Image)

Shivaji Maharaj Jayanti Marathi Wishes: महाराष्ट्राचे दैवत, अनेकांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जन्मतारखेवरून (Birth Date) अनेक वर्षे वाद चालू आहे. फाल्गुन वद्य तृतिया शके 1551 (19 फेब्रुवारी 1630) आणि वैशाख शुद्ध द्वीतिया शके 1549 (6 एप्रिल 1927) या दोन तारखांवरून हे वाद चालू आहेत. याबाबत महाराष्ट्र सरकारने एक समिती नेमली होती, त्यांनी दिलेल्या अहवालानंतर शासकीय दृष्ट्या 19 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. अशाप्रकारे उद्या महाराजांची तिथीनुसार जयंती (Shiv Jayanti Tithi 2020) साजरी केली जात आहे. शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे आचार समाजातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचावेत हा शिवजयंतीचा उद्देश आहे.

छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करुन मराठी जनतेच्या मनात स्वातंत्र्याची भावना निर्माण केली. आजही महाराष्ट्राच्या दऱ्या, डोंगर, कड्या-कपारीमधून हिंडणारा मोकळा वारा छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देतो. तर शिवजयंती निमित्ताने आपल्या जवळच्या लोकांना द्या WhatsApp Status, Quotes, Wishes, Messages च्या माध्यमातून शुभेच्छा आणि साजरा करा तिथीनुसार शिवजन्मोत्सव. (शिवजयंतीच्या शुभेच्छा देणार्‍या Messages, Greetings, Whatsapp Status, Facebook Images शेअर करुन साजरा करा यंदाचा शिवछत्रपतींचा जन्मोत्सव!)

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा

सर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!

Shiv Jayanti Tithi 2020

सिंहाची चाल… गरुडाची नजर...

स्त्रियांचा आदर… शत्रूचे मर्दन...

असेच असावे मावळ्यांचे वर्तन…

हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण...

जय शिवराय... शिवजयंतीच्या शुभेच्छा!

Shiv Jayanti Tithi 2020

जगणारे ते मावळे होते...जगवणारा तो महाराष्ट्र होता

स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेवर मायेने हात फिरवणारा फक्त शिवबा होता

शिवजयंतीच्या शुभेच्छा!

Shiv Jayanti Tithi 2020

(शिव जयंती च्या शुभेच्छा देणारे मराठी मेसेजेस, Greetings, Facebook आणि WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून साजरा करा शिवरायांचा जन्मदिवस)

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता

झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता

जय भवानी…. जय शिवाजी

शिवजयंतीच्या शुभेच्छा!

Shiv Jayanti Tithi 2020

एक विचार समतेचा… एक विचार नितीचा

ना धर्माचा.. ना जातीचा.. माझा राजा फक्त मातीचा

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

Shiv Jayanti Tithi 2020

(हेही वाचा: शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेचा नेमका अर्थ काय? वाचा सविस्तर)

दरम्यान, शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी महात्मा फुलेंनी इ.स. 1870 साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती. हा शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. त्यानंतर बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूट करण्याचे काम केले. शिवजयंतीचे औचित्य साधून रायगड, सिंहगड, प्रतापगड, शिवनेरी, राजगड, पन्हाळा यासारख्या अनेक किल्ल्यांवरही हा सोहळा साजरा होणार आहे.