Shiv Jayanti 2020 Songs: शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कतृत्वाचा गौरव करणारी खास मराठमोळी गाणी
Shivaji Maharaj Jayanti (Photo Credits: Wikimedia Commons)

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. तर राज्यात शिवजयंतीच्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच राजकीय मंडळींपासून ते सामान्यांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कतृत्वाचा गौरव करत आहेत. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करुन मराठी जनतेच्या मनात स्वातंत्र्याची भावना निर्माण केली. आजही महाराष्ट्राच्या दऱ्या, डोंगर, कड्या-कपारीमधून हिंडणारा मोकळा वारा छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देतो.

महाराष्ट्रामध्ये शिवजयंतीचा उत्सव 19 फेब्रुवारी दिवशी साजरी केली जाते. मात्र ही शिवजयंती तारखेनुसार साजरी केली जाते. मात्र तिथीनुसार शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया दिवशी झाला अशी इतिहासामध्ये नोंद आहे. त्यामुळे यंदा तिथीनुसार शिवजयंतीचा उत्सव 12 मार्च 2020 दिवशी साजरा केला जातो. तर तिथीनुसार शिवजयंतीचे औचित्य साधून खास तुमच्यासाठीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या कतृत्वाचा गौरव करणारी खास मराठमोळी गाणी.(Shiv Jayanti Tithi 2020 Wishes: तिथीनुसार शिवजयंतीच्या मराठी शुभेच्छा, Messages, Greetings, Whatsapp Status, Images शेअर करुन साजरा करा यंदाचा शिवजन्मोत्सव)

>>छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा

>>चित्रपट:  शिवाजी राजे भोसले बोलतोय

>>माझ्या राजा रे गाणे

  >>चित्रपट: बघतोय काय मुजरा कर 

>>बाल शिवाजी राजा झाला 

>>ओ राजे गाणे

>>चित्रपट: मी शिवाजी राजे भोसले बोलतोय 

>>भगवा झेंडा गाणे

Shiv Jayanti Tithi 2020 Wishes: तिथीनुसार शिवजयंतीच्या मराठी शुभेच्छा, Messages, Images,Greetings: Watch Video

महाराष्ट्रामध्ये अनेक शिवभक्त मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून सेलिब्रेट करतात. परंतू वेगवेगळ्या दिनदर्शिकांमध्ये वेगवेगळी तारीख दाखवली जाते. शिवाजी महाराजांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी विविध संस्था आणि सरकार कडून पुढे शिवजयंतीचा उत्सव सार्वजनिक आणि भव्य स्वरूपात साजरा करण्याला सुरूवात झाली. या कार्यक्रमामध्ये शिवाजी महाराजांच्या पोवाड्यामधून त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. तर साहसी कथा सांगून त्यांचे विचार रूजवण्याचे प्रयत्न केले जाते.