Savitribai Phule 122nd Death Anniversary: सावित्रीबाई फुले या भारतातील प्रथम महिला शिक्षका यांची आज (10 मार्च) 122वी पुण्यतिथी आहे. सावित्रीबाई एक उत्तम कवयित्री, समाजसेविका होय. तसेच त्यांना 'मुक्तिदाता' म्हणून संबोधले जाते. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य महिलांना शिक्षण देणे आणि महिलांना समाजात त्यांचे हक्क मिळण्यासाठी कायम लढा दिला आहे. महिलांना शिक्षण देण्यासाठी समाजात राहून त्यांना खुप संघर्ष करावा लागला. परंतु सावित्रीबाई यांनी कधीच हार मानली नाही. पूर्ण आत्मविश्वासाने निडरपणे आलेल्या संकंटाना समोरे जाण्याची हिंमत त्यांनी दाखवली. याच कारणामुळे सावित्रीबाई यांनी महिलांना शिक्षण आणि हक्क देण्यासाठी यशस्वी झाल्या.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगांव येथे 3 जानेवारी 1831 रोजी झाला. त्यानंतर 1840 सालाच्या काळात बालविवाह करण्याची परंपरा होती. तेव्हा अवघ्या 9 वर्षाच्या असताना त्यांचे लग्न 12 वर्षाचे ज्योतिराव फुले यांच्या सोबत लावण्यात आले. सावित्रीबाई ह्यांचे जेव्हा लग्न झाले त्यावेळी त्या शिक्षित नव्हत्या. मात्र लग्नानंतर ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई यांना लिहायला-वाचायला शिकवले. त्यावेळचा काळ हा मुलींच्या शिक्षणाबाबत अत्यंत दयनीय होता. त्याचसोबत मुलींना शिक्षण घेण्यासाठी त्यावेळी समाजातून तीव्र विरोध केला जात असे.
परंतु समाजाच्या विचारसरणी पासून दूर जात ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई यांना शिक्षण दिले. त्या दरम्यान फुले यांना खुप संघर्ष करावा लागला होता. तरीही लोकांच्या शिव्याशापांकडे दुर्लक्ष करत फुले यांनी सावित्रीबाई यांचे नाव शाळेत दाखल केले. सावित्रीबाई यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी समाजातील अन्य महिलांनासुद्धा शिक्षण देण्याचा निर्धार केला.मात्र समाजातील रुढी आणि परंपरा यांच्या विरुद्ध जाऊन त्यांनी महिलांना यशस्वीपणे शिक्षण दिले.
समाजाविरुद्ध जाऊन शिक्षणासाठी लढा देण्यासाठीनसावित्रीबाई यांना ज्योतिबा फुले यांची साथ होती. त्यामुळे 1848 रोजी महिलांसाठी प्रथम शाळा सुरु केली. तसेच महिलांसाठी भारतातील ती प्रथम शाळा असल्याचे म्हटले जाते.