आज (11 जून 2021) भारताचे महान क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसेनानी पंडित राम प्रसाद बिस्मिल यांची जयंती (Ram Prasad Bismil Jayanti) साजरी केली जात आहे. त्यांचा जन्म 1897 मध्ये ब्रिटिश भारताच्या उत्तर-पश्चिम प्रांत (उत्तर प्रदेश) मधील शाहजहांपूर येथे झाला. राम प्रसाद बिस्मिल यांनी वडिलांकडून हिंदी भाषा शिकली त्यांनंतर त्यांना मौलवीकडे उर्दू शिकण्यासाठी पाठवले गेले. बिस्मिल हे फक्त एक महान स्वातंत्र्यसैनिक नव्हते तर एक उत्तम कवी आणि एक चांगले लेखक देखील होते. 1918 च्या मैनपुरी षडयंत्र आणि 1925 च्या काकोरी प्रकरणात त्यांचा सहभाग होता. राम प्रसाद बिस्मिल यांच्या जयंतीनिमित्त या खास निमित्ताने जाणून घेऊयात त्यांचे खास विचार. (Sane Guruji Death Anniversary: साने गुरूजी यांच्या पुण्यतिथी निमित्त जगाला योग्य दिशा दाखवणारे या विद्वान पुरुषाचे 10 अमूल्य विचार )
राम प्रसाद बिस्मिल यांचे विचार
- यदि किसी के मन में जोश, उमंग या उत्तेजना पैदा हो तो शीघ्र गावों में जाकर कृषक की दशा को सुधारें.
- मैं ब्रिटिश साम्राज्य का नाश चाहता हूँ.
- मुझे विश्वास है कि मेरी आत्मा मातृभूमि तथा उसकी दीन संतति के लिए नए उत्साह और ओज के साथ काम करने के लिए फिर लौट आयेगी.
- यदि देशहित मरना पड़े मुझे सहस्रों बार भी, तो भी न मैं इस कष्ट को निज ध्यान में लाऊं कभी. हे ईश! भारतवर्ष में शत बार मेरा जन्म हो, कारण सदा ही मृत्यु का देशोपकारक कर्म हो.
- मैं जानता हूँ कि मैं मरूँगा, किन्तु मैं मरने से नहीं घबराता. किन्तु जनाब, क्या इससे सरकार का उद्देश्य पूर्ण होगा? क्या इसी तरह हमेशा भारत माँ के वक्षस्थल पर विदेशियों का तांडव नृत्य होता रहेगा? कदापि नहीं. इतिहास इसका प्रमाण है. मैं मरूँगा किन्तु फिर दुबारा जन्म लूँगा और मातृभूमि का उद्धार करूँगा.
- यदि किसी के मन में जोश, उमंग या उत्तेजना पैदा हो तो शीघ्र गावों में जाकर कृषक की दशा सुधारें.मुझे विश्वास है कि मेरी आत्मा मातृभूमि तथा उसकी दीन संतति के लिए नए उत्साह और ओज के साथ काम करने के लिए शीघ्र ही फिर लौट आयेगी.
बिस्मिल फक्त 30 वर्षांचे होते जेव्हा त्यांना फाशी देण्यात आली. बिस्मिलने गळ्यात फास टाकण्यापूर्वी 'सर्फरोशी की तमन्ना अब हमरा दिल मैं है' ही कविता वाचली होती. त्यांच्या बलिदानाने संपूर्ण भारत हादरला होतो.आजही लोक राम प्रसाद बिस्मिलच्या बलिदानाला व भावनेला सलाम करतात.