Constitution Day 2024 Wishes In Marathi: भारतीय राज्यघटनेची (Constitution of India) जाणीव करून देणे आणि संविधानाचे महत्त्व आणि आंबेडकरांचे विचार आणि संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने दरवर्षी संविधान दिन (Constitution Day) साजरा केला जातो. लोकशाही राष्ट्रासाठी, संविधान देशातील नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये ठरवते. तसेच संविधानात सरकारचे अधिकार आणि कर्तव्ये परिभाषित केलेले असतात. संविधान हे कोणत्याही देशाची शासन व्यवस्था आणि राज्य चालवण्यासाठी बनवलेले दस्तऐवज आहे.
संविधानाची गरज ओळखून भारतानेही स्वातंत्र्यानंतर संविधान स्वीकारले. राज्यघटना बनवण्यासाठी अनेक देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून त्यातून चांगले नियम व कायदे काढून भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली. भारतात दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. संविधान दिनाच्या निमित्ताने लोक एकमेकांना खास शुभेच्छा देतात. तुम्ही देखील भारतीय संविधान दिनानिमित्त Messages, Images, Quotes द्वारे नागरिकांना खास मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता.
संविधान दिनाच्या शुभेच्छा -
दलितांचे ते तलवार होऊन गेले,
अन्यायाविरुध्द प्रहार होऊन गेले,
वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा त्यांनी
या भारताचे संविधान लिहिले
संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
खूप भाषा, शेकडो विधी
आणि हजार विधाने आहेत...
या सर्वांना जोडून ठेवणारे
आपले संविधान आहे....
भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता... अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता....
असा रामजी बाबांचा लेक
भिमराव आंबेडकर लाखात नाही तर जगात एक होता
संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जन्म घेतला दिन दलितांचा उद्धार कराया,
संविधान लिहिण्याचे दैदिप्यमान कार्य कराया, झोपेत असलेल्या समाजास, जगण्याचा अधिकार द्यावया,
शतशत नमन करतो मी तुजला भीमराया....
संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
नको राजेशाही,
नको ठोकशाही,
संविधानाने दिली लोकशाही...
भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
1949 मध्ये भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटनेची गरज भासू लागली. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी दोन वर्षे 11 महिने आणि 18 दिवसांचा कालावधी लागला. त्यानंतर 26 जानेवारी 1949 रोजी भारतीय प्रजासत्ताकाची राज्यघटना तयार झाली. तथापि, हे संविधान अधिकृतपणे 26 जानेवारी 1950 रोजी लागू करण्यात आले. त्यामुळे हा दिवस दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.