Marathi Bhasha Din 2020: भारतामधील प्रमुख 22 भाषांपैकी एक असणार्‍या मराठी भाषेचंं देशातील आणि जगातील स्थान कितवं?
Marathi Bhasha Din 2020 (Photo Credits-File Image)

Marathi Rajbhasha Diwas 2020:   कवी कुसुमाग्रज (Kusumagraj) म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर (Vishnu Vaman Shirvadkar)  यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी या दिवसाचं औचित्य साधून खास कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भारतामध्ये भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. मात्र मराठी भाषा महाराष्ट्रासोबतच गोवा, दीव दमणमध्ये बोलली जाते. आज मराठी भाषिक लोकं महाराष्ट्रातून बाहेर पडून जगभरात पोहचला आहे परिणामी आता मराठी भाषेनेदेखील सीमा ओलांडल्या आहेत. जगभरात डंका वाजवत असलेल्या या मधाळ भाषेची उत्पत्ती कशी झाली? आज जगात मराठी बोलणार्‍यांची संख्या किती? हे जाणून घ्या आणि यंदाच्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने तुमच्या मातृभाषेबद्दल अभिमान बाळगून त्याचा वसा पुढच्या पिढी पर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करा. Marathi Bhasha Din 2020 Wishes: मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देणारे संदेश, Greeting, Messages, Whatsapp Status, Facebook Images च्या माध्यमातून शेअर करून जपा आपल्या मातृभाषेचा वसा!

मराठी भाषेबद्दल जाणून घ्या काही खास गोष्टी

  • मराठी भाषा 9 व्या शतकापासून प्रचलित असून या भाषेची निर्मिती संस्कृत भाषेपासून झाली आहे. देशातील प्रमुख 22 भाषांमध्ये मराठी भाषेचा समावेश आहे.
  • महाराष्ट्र व गोवा या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. गोव्यात कोकणी भाषा बोलली जात असली तरीही प्रशासकीय कामांमध्ये मराठी भाषेचा वापर केला जातो.
  • मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील 10 वी तर भारतातील 3 री भाषा आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, मराठी बोलणाऱ्यांची लोकसंख्या सुमारे 9 कोटी आहे.
  • 1278 साली म्हाइंभटांनी 'लीळाचरित्र' हा ग्रंथ लिहून मराठी भाषेचा पाया रचला आहे. त्यानंतर ज्ञानेश्वरांनी 1290 साली 'ज्ञानेश्वरी' रचली.
  • मराठी भाषा ही आता देवनागरी लिपी मध्ये लिहली जाते. मात्र ब्राह्मी लिपीतदेखील मराठी भाषेतील शिलालेख आढळले आहेत.

कुसुमाग्रज यांना 1987 साली साहित्य विश्वातील मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य सरकारकडून कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करण्याला सुरूवात केली. हा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांच्या विशाखा कवितासंग्रहाला मिळाला आहे. दरम्यान कुसुमाग्रजांचा जन्म दिवस हा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करण्यामागे जागतिक मराठी अकादमीनेदेखील पुढाकार घेतला होता.