
Marathi Language Day 2020 Marathi Wishes: मराठी भाषेला ज्यांनी जिवंत ठेवलं अश्या थोर साहित्यकारांमधील एक मानाचं नाव म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज. (Kusumagraj) त्यांचा जन्मदिवस म्हणजेच 27 फेब्रुवारी हा 'मराठी भाषा गौरव दिन' (Marathi Bhasha Gaurav Din) म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी महाराष्ट्रासहित जिथे जिथे मराठी माणूस स्थित आहे तिथे मराठी राजभाषा दिनाचा शानदार सोहळा पार पडतो. उद्या आपणही हा दिवस जल्लोषात साजरा करणार असाल, पण म्हणतात ना अलीकडे सोशल मीडियाच्या डिजिटल जगात कोणत्याही खास दिवसाच्या शुभेच्छा जोवर ऑनलाईन दिल्या जात नाहीत तोपर्यंत काही त्याची गोडी वाटतच नाही, आणि हरकत काय आहे ना? उलट अधिक अधिक लोकांपर्यंत आपल्या मायमराठीचं थोर पण पोहचवण्याची ही संधीच म्हणायला हवी, तुम्हालाही अशा डिजिटल शुभेच्छा द्यायच्या असतील तर हे काही खास संदेश, Wishes, Greeting, Whatsapp Status, Images, Facebookच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्रपरिवार, नातेवाईकांसोबत शेअर करू शकता. Marathi Rajbhasha Din 2020 Quotes: संत ज्ञानेश्वर ते कविवर्य सुरेश भट यांनी अशी मांडली मराठी भाषेची थोरवी!
मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देणारे संदेश





जगाची कवाडं उघडणाऱ्या इंग्रजी भाषेच्या जगात घराचं दार उघडून आपलेपणची भावना निर्माण करणारी मराठी भाषा, वाऱ्याची झुळूक यावी अशी अलगद, तर कधी झंझावत्या वादळाप्रमाणे, तलवारीच्या टोकावर रूढ मराठी भाषा, संतांची, महात्म्यांची,कलाकारांची, पांढऱ्या सुटाबुटातल्या साहेबाची आणि झोपडीतल्या बापड्याची मराठी,एकाच भाषेच्या नाना तऱ्हा आणि तरीही टिकून राहणारा गोडवा अशी समृद्धी ल्यायलेल्या मराठी भाषेसाठी 27 फेब्रुवारी हा दिवस अत्यंत खास मानला जातो. त्यामुळे हा खास दिवस तुम्ही कुठल्या पद्धतीने साजरा करणार आहेत याचा नक्की विचार करा, आणि आम्हाला सुद्धा कळवायला विसरू नका.