
Marathi Language Day 2020: मराठी राजभाषा दिवस (Marathi Rajbhasha Din) दरवर्षी 27 फेब्रुवारी दिवशी साजरा केला जातो. कवी कुसुमाग्रजांच्या जयंती (Kusumagraj Jayanti) निमित्त या दिवशी मराठी भाषा संवर्धनाचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील 10 वी तर भारत देशातील 3 री भाषा आहे. 2011 साली करण्यात आलेल्या जनगणनेनुसार, मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या सुमारे 9 कोटींच्या आसपास आहे. 'लीळाचरित्र' या ग्रंथाच्या माध्यमातून म्हाइंभटांनी मराठी भाषेचा पाया रोवला. संत परंपरेपासूनच मराठी भाषेचा गौरव साहित्याच्या अनेक प्रकारांमध्ये पहायला मिळतो. कवी कुसुमाग्रज, सुरेश भट यांनी आपल्या साहित्यामध्ये मराठी भाषेची गायलेली थोरवी जाणून घ्या आणि यंदाच्या मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने नक्की शेअर करा. Marathi Rajbhasha Din 2020: मराठी राजभाषा दिन कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त का साजरा केला जातो?
मराठी भाषा ही वळवावी तशी वळते असं देखील अनेकजण म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रातहिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली त्यानंतर पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. पुढे मराठी भाषेला राजाश्रय मिळाला.भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेनुसार अधिकृत राजभाषेचा दर्जा देण्यात आला.
मराठी भाषेची थोरवी गाणार्या खास ओळी
माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
-संत ज्ञानेश्वर

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दर्याखोर्यांतील शिळा
-कुसुमाग्रज

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
- सुरेश भट

स्वर्गलोकाहून थोर मला हिचे अभिमान
- विष्णू वामन शिरवाडकर

मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज (Kusumagraj) यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांना 1987 साली साहित्य विश्वातील मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य सरकारकडून कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करण्याला सुरूवात केली.