Shravan Month Mangalagauri: श्रावण महिन्यात जसा सोमवारला विशेष महत्त्व दिले जाते त्याचप्रमाणे मंगळवारला विशेष मानले जाते. ज्या स्त्रीयांचे लग्न झालेले असते त्या आपल्या पतीच्या दीर्घआयुष्यासाठी हा व्रत करतात. मंगळागौरीचा व्रत विशेष म्हणजे नवविवाहीत स्त्रीयांकडून केला जातो. शीव पार्वतीचा आदर्श म्हणून दोघांची सकाळी पूजा केली जाते. मंगळगौरीला हिंदू संस्कृतीत विशेष महत्त्व दिले जाते. 17 जुलै पासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. जाणून घेऊयात मंगळागौरीची व्रत तिथी, परंपरा पूजेविषयी
मंगळागौरी व्रत तीथी
अधिक मास मंगळा गौरी व्रत तिथीपहिला मंगळवार- 18 जुलै 2023
दुसरा मंगळवार - 25 जुलै 2023
तीसरा मंगळवार - 1 ऑगस्ट 2023
चौथा मंगळवार - 8ऑगस्ट 2023
पाचवा मंगळवार - 15 ऑगस्ट 2023
निज श्रावण मंगळा गौरी व्रत तिथीपहिला मंगळवार- 22 ऑगस्ट 2023
दुसरा मंगळवार - 29ऑगस्ट 2023
तीसरा मंगळवार - 5 सप्टेंबर 2023
चौथा मंगळवार - 12 सप्टेंबर 2023
का साजरी केली जाते मंगळागौर ?
श्रावण महिना सुरु झाला की, हिंदू संस्कृतील वेगवेगळे सण साजरी करायला मिळतात. श्रावणातील प्रत्येक दिवसांला विशेष महत्त्व दिले जाते. पतीपत्नीमधील प्रेम आणि निष्ठा वाढावी यासाठी शिवपार्वतीचा आशिर्वाद आणि त्यांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी ही पूजा केली जाते. विशेष म्हणजे पार्वतीची पूजा केली जाते. मंगळगौरीच्या व्रताच्या दिवसी सर्व महिलामंडळ एकत्र येतात. पारंपारिक खेळ, गाणी, भजणं, पूजा, गंमतीजमती करत असतात.
मंगळागौरीचं व्रत कसं करतात ?
मंगळवारी सकाळी अंघोळ केल्यानंतर साडी नेसून, ही पूजा केली जाते. सर्वप्रथम गणपतीची पूजा केली जाते. लग्नातील अन्नपूर्णेची धातूची मूर्ती चौरंगावर स्थापन करावी. शेजारी शिवपिंड, समोर कणकेचे दिवे अशी आरास सजवण्यात येते. नंतर मग मंगळागौर किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर शिव-मंगलागौरीचं आवाहन करावं. देवीला विविध फुलं वाहावीत. नंतर तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगाची डाळ अशा धान्यांची मूठ अर्पण करावी. नंतर मग एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचावी. कहाणी वाचून झाली की महानैवेद्य अर्पण करावा. नैवेद्य अर्पन करतांना 16 दिव्यां त्या नैवद्यासमोर लावावेत. यानंतर मनोभावे पूजा करुन अखंड सौभाग्य प्राप्तीचा वसा मागावा. पारंपारिक खेळ, फुगडी, गाणी, मंगळागौरीचा विशेष डान्स करत अशा प्रकारे आनंदाने हा दिवस साजरा होतो. लग्नानंतर सलग 5 वर्षे हे व्रत करावं.