24 नोव्हेंबरपासून यंदा मार्गशीर्ष (Margashirsha) महिन्याला आणि महालक्ष्मी गुरूवार व्रताला (Mahalaxmi Guruvar Vrat) सुरूवात होत आहे. हिंदू धर्मियांसाठी मार्गशीर्ष महिना हा पवित्र महिन्यांपैकी एक आहे. त्यामुळे या महिन्यात व्रत वैकल्यांना विशेष महत्त्व आहे. महिलांसाठी मार्गशीर्ष महिन्यातले गुरूवार हे खास असतात. मग यंदा 24 नोव्हेंबरपासून सुरू होणार्या गुरूवारच्या व्रताच्या मंगलमय शुभेच्छा सोशल मीडीयात प्रियजणांना देण्यासाठी ही खास मराठी शुभेच्छापत्र, ग्रिटिंग्स WhatsApp Status, Wallpapers शेअर करून हा दिवस अजून खास करू शकता.
मार्गशीर्ष महिन्यात दर गुरूवारी महालक्ष्मीचं व्रत करण्याची रीत अनेक कुटुंब आजही पाळतात. त्यानिमित्ताने घरात महालक्ष्मीच्या रूपात कलश स्थापन करून तिचं सकाळ-संध्याकाळ पूजन केले जातं. मग अशा या मंगल दिवसाचा आनंद सोशल मीडीयातही खास फोटोज, ग्रीटिंग्स शेअर करून साजरा करू शकता. नक्की वाचा: Margashirsha Guruvar Vrat 2022 Dates: 24 नोव्हेंबर पासून यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात; पहा महालक्ष्मी व्रताच्या तारखा!
महालक्ष्मी गुरूवार व्रताच्या शुभेच्छा
- मार्गशीर्ष गुरूवार व्रताच्या शुभेच्छा!
- महालक्ष्मी व्रत गुरूवारच्या शुभेच्छा!
- मार्गशीर्ष महिन्यासह तुमच्या आयुष्यात सुख, शांती, सौभाग्य येवो हीच आमची कामना!
- मार्गाशीर्ष मासारंभ
- मार्गशीर्ष महिन्याच्या आणि महालक्ष्मी व्रताच्या पहिल्या गुरूवार च्या शुभेच्छा
महिलांसाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारचं व्रत खास असतं. या दिवशी अनेक महिला दिवसभर उपवास ठेवतात. संध्याकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून तो सोडला जातो. तर शेवटच्या गुरूवारी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो. महिला, कुमारिका यांना हळदी कुंकू देऊन, एखादं वाण देऊन लक्ष्मीच्या रूपात तिचा मानसन्मान केला जातो. यंदा मार्गशीर्ष गुरूवारचे 5 दिवस पाळले जाणार आहे.