मुस्लिम समाजासाठी खास असलेला रमजानचा (Ramadan) महिना यंदा भारतामध्ये 22 मार्चपासून होत आहे. 22 मार्चला रमजानचा चांद पाहिल्यानंतर 23 मार्च अर्थात गुरूवार पासून मुस्लिम बांधवांचे रोजे सुरू होणार आहेत. रमजानच्या चांद वर रमजान महिन्यातील रोजे कधी सुरू होणार याचं गणित बेतलेलं असतं. 22 मार्चला चंद्रदर्शन झाल्यास 23 मार्चपासून रोजांना सुरूवात होणार आहे. अल्लाह कडे चूकांची कबुली देत प्रार्थना केली जाते. घरात सुख, समृद्धी रहावी म्हणून दिवसरात्र नमाज पठण, कुराण पठण केले जाते.
रोजे ठेवणं ही एक मुस्लिम बांधवांसाठी महत्त्वाची रीत आहे. यासाठी सेहरी आणि इफ्तारच्या वेळा महत्त्वाच्या असतात. महाराष्ट्रातील विविध प्रांतामध्ये या वेळा वेगवेगळ्या असतात. मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव मधील मुस्लिम बांधव सकाळी सेहरी आणि संध्याकाळी इफ्तार योग्य वेळी करू शकतील यासाठी त्याच्या वेळा देखील तुमच्या प्रांतानुसार पहायला विसरू नका.
पुणे शहरातील सेहरी व इफ्तारची वेळ
मुंबई शहरातील सेहरी व इफ्तारची वेळ
नाशिक शहरातील सेहरी व इफ्तारची वेळ
जळगाव शहरातील सेहरी व इफ्तारची वेळ
रमजानच्या या पवित्र महिन्यात उपवास ठेवणाऱ्यांसाठी दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. पहिली सेहरी जी सूर्योदयापूर्वी केली जाते. त्यानंतर दिवसभर काहीही न खाता किंवा न पिता संध्याकाळी सूर्यास्तानंतर इफ्तार केली जाते. इफ्तार नंतर, लोक पुन्हा एकदा मगरीबची नमाज अदा केल्यानंतर इबादत करण्यामध्ये गुंततात.
रमजानच्या या पवित्र महिन्यात ते उपवासासह फित्रा आणि जकात देतात. ते दिल्याने तुमच्या घराला आशीर्वाद तर मिळतातच शिवाय तुमचं आरोग्यही चांगलं राहतं. याशिवाय असे म्हटले जाते की रमजानमध्ये लोकांचा खर्च अधिक वाढतो, अशा परिस्थितीत फित्रा आणि जकात गरीब व्यक्तीसाठी दिलासापेक्षा कमी नाही. म्हणूनच रमजान महिन्यात जकात आणि फित्रा देणे सुन्नत आहे.