Maharashtra Din 2020: स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये  या '107' हुतात्मांनी दिले होते बलिदान!
Martyrs of Samyukta Maharashtra Movement (Photo Credits : commons.wikimedia)

107 Martyrs of Samyukta Maharashtra Movement:  1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन (Maharashtra Din) म्हणून साजरा केला जातो. यंदा  त्याचं हिरक महोत्सवी म्हणजे 60 वं वर्ष आहे. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत या दिवशी जगभरातील मराठी बांधव महाराष्ट्र दिनानिमित्त संस्कृती जपण्यास ती वृद्धिगंत करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करतात. मात्र मुंबईसह महाराष्ट्र राज्य मराठी लोकांना मिळणं हे सोप्प नव्हतं. त्यासाठी साहित्यिक, राजकारणी यांच्यासह कलाकार आणि सामान्य जनता एकवटली आणि निर्माण झालेल्या संघर्षलढ्याला मिळालेलं यश म्हणजे मुंबईसह महाराष्ट्र राज्य अस्तित्त्वामध्ये येणं. आजही हुतात्मा  चौकात आणि करोडो मनात या लढ्याची आग धगधगती आहे.  Maharashtra Day Quotes: गोविंदाग्रज ते रामदास स्वामी यांच्या शब्दांत महाराष्ट्राची महती पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रं, ग्रिटिंग्स !

कशी होती स्वतंत्र्य महाराष्ट्र चळवळ?

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषेच्या आधारे देशात प्रांतवार रचना करण्याचे ठरले मात्र मुंबई महराष्ट्राला देण्याऐवजी त्याला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करण्याचा मानस होता. मात्र महाराष्ट्रातील राजकारणी, जनता, कलाकार यांनी एकत्र येऊन मुंबईसह महाराष्ट्र राज्य बनलं पाहिजे ही मागणी केली. दरम्यान 1955 साली कॉंग्रेस नेत्यांनी मुंबईमध्ये सभा घेऊन 'कॉंग्रेस जिवंत असे पर्यंत मुंबई महाराष्ट्राला देणार नाही'. असं प्रक्षोभक वक्तव्य केलं. मात्र यावरून भडकलेल्यांनी सभा उधळली. दरम्यान गोळीबारामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला. पुढे चळवळ व्यापक झाली. ती दडपण्यासाठी गोळीबाराचे आदेश देण्यात आल्यानंतर 80 जणांचा मृत्यू झाला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये बलिदान देणार्‍यांची संख्या हळूहळू वाढत गेली. सुरूवातीला 105 हुतात्मे असल्याचं सांगण्यात आले होते मात्र नंतर काही शहीदांच्या कुटुंबीयांनी सरकारकडे केलेल्या पाठपुरवठ्यामुळे दोन हुताम्यांना 'शहीद' म्हणून दर्जा देण्यात आला. आणि आता मुंबईतील 'हुतात्मा चौक'  परिसरामध्ये एकूण 107 हुतात्म्यांची नावं कोरण्यात आली आहेत. Maharashtra Day 2020 Images: महाराष्ट्र दिन शुभेच्छा मराठी Wishes, Messages, HD Wallpapers च्या माध्यमातून देत साजरा करा हा खास दिवस!

कोण होते संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 107 हुतात्मे?

१] सिताराम बनाजी पवार

२] जोसेफ डेव्हिड पेजारकर

३] चिमणलाल डी. शेठ

४] भास्कर नारायण कामतेकर

५] रामचंद्र सेवाराम

६] शंकर खोटे

७] धर्माजी गंगाराम नागवेकर

८] रामचंद्र लक्ष्मण जाधव

९] के. जे. झेवियर

१०] पी. एस. जॉन

११] शरद जी. वाणी

१२] वेदीसिंग

१३] रामचंद्र भाटीया

१४] गंगाराम गुणाजी

१५] गजानन ऊर्फ बंडू गोखले

१६] निवृत्ती विठोबा मोरे

१७] आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर

१८] बालप्पा मुतण्णा कामाठी

१९] धोंडू लक्ष्मण पारडूले

२०] भाऊ सखाराम कदम

२१] यशवंत बाबाजी भगत

२२] गोविंद बाबूराव जोगल

२३] पांडूरंग धोंडू धाडवे

२४] गोपाळ चिमाजी कोरडे

२५] पांडूरंग बाबाजी जाधव

२६] बाबू हरी दाते

२७] अनुप माहावीर

२८] विनायक पांचाळ

२९] सिताराम गणपत म्हादे

३०] सुभाष भिवा बोरकर

३१] गणपत रामा तानकर

३२] सिताराम गयादीन

३३] गोरखनाथ रावजी जगताप

३४] महमद अली

३५] तुळशीराम पुंजाजी बेलसरे

३६] देवाजी सखाराम पाटील

३७] शामलाल जेठानंद

३८] सदाशिव महादेव भोसले

३९] भिकाजी पांडूरंग रंगाटे

४०] वासुदेव सुर्याजी मांजरेकर

४१] भिकाजी बाबू बांबरकर

४२] सखाराम श्रीपत ढमाले

४३] नरेंद्र नारायण प्रधान

४४] शंकर गोपाल कुष्टे

४५] दत्ताराम कृष्णा सावंत

४६] बबन बापू भरगुडे

४७] विष्णू सखाराम बने

४८] सिताराम धोंडू राडये

४९] तुकाराम धोंडू शिंदे

५०] विठ्ठल गंगाराम मोरे

५१] रामा लखन विंदा

५२] एडवीन आमब्रोझ साळवी

५३] बाबा महादू सावंत

५४] वसंत द्वारकानाथ कन्याळकर

५५] विठ्ठल दौलत साळुंखे

५६] रामनाथ पांडूरंग अमृते

५७] परशुराम अंबाजी देसाई

५८] घनश्याम बाबू कोलार

५९] धोंडू रामकृष्ण सुतार

६०] मुनीमजी बलदेव पांडे

६१] मारुती विठोबा म्हस्के

६२] भाऊ कोंडीबा भास्कर

६३] धोंडो राघो पुजारी

६४] ह्रुदयसिंग दारजेसिंग

६५] पांडू माहादू अवरीरकर

६६] शंकर विठोबा राणे

६७] विजयकुमार सदाशिव भडेकर

६८] कृष्णाजी गणू शिंदे

६९] रामचंद्र विठ्ठल चौगुले

७०] धोंडू भागू जाधव

७१] रघुनाथ सखाराम बीनगुडे

७२] काशीनाथ गोविंद चिंदरकर

७३] करपैया किरमल देवेंद्र

७४] चुलाराम मुंबराज

७५] बालमोहन

७६] अनंता

७७] गंगाराम विष्णू गुरव

७८] रत्नु गोंदिवरे

७९] सय्यद कासम

८०] भिकाजी दाजी

८१] अनंत गोलतकर

८२] किसन वीरकर

८३] सुखलाल रामलाल बंसकर

८४] पांडूरंग विष्णू वाळके

८५] फुलवरी मगरु

८६] गुलाब कृष्णा खवळे

८७] बाबूराव देवदास पाटील

८८] लक्ष्मण नरहरी थोरात

८९] ठमाबाई विठ्ठल सूर्यभान

९०] गणपत रामा भुते

९१] मुनशी वझीऱअली

९२] दौलतराम मथुरादास

९३] विठ्ठल नारायण चव्हाण

९४] देवजी शिवन राठोड

९५] रावजीभाई डोसाभाई पटेल

९६] होरमसजी करसेटजी

९७] गिरधर हेमचंद लोहार

९८] सत्तू खंडू वाईकर—नाशिक --

९९] गणपत श्रीधर जोशी

१००] माधव राजाराम तुरे(बेलदार) -- बेळगांव --

१०१] मारुती बेन्नाळकर

१०२] मधूकर बापू बांदेकर

१०३] लक्ष्मण गोविंद गावडे

१०४] महादेव बारीगडी -- निपाणी --

१०५] कमलाबाई मोहिते

१०६] सिताराम दुलाजी घाडीगांवकर

१०७] शंकरराव तोरस्कर

या चळवळीमधील हुतात्म्यांमध्ये कर्नाटक, आंध्रप्रदेशातील काही लोकांचा समावेश आहे.

हुतात्मा चौक

स्वतंत्र महाराष्ट्राच्या चळवळीमधील लढ्यातील आंदोलकांवर गोळीबाराचे आदेश दिल्यानंतर मुंबईतील फ्लोरा फाऊंटन परिसरात रक्त सांडले. जमावावर गोळीबार केल्यानंतर 107 जणांनी आपले प्राण गमावले. त्यांच्या स्मरणार्थ फ्लोरा फाऊंटन परिसरामध्ये 1965 साली स्मारक उभारण्यात आलं.