Maharashtra Day 2020 Images: महाराष्ट्र दिन शुभेच्छा मराठी Wishes, Messages, HD Wallpapers च्या माध्यमातून देत साजरा करा हा खास दिवस!
Maharashtra Day

Maharashtra Day 2020: अवघ्या मराठी मनाला अभिमान वाटावा आणि उत्साहाने साजरा करावा असा दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन (Maharashtra Day). 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र (Maharashtra) हे स्वतंत्र राज्य अस्तित्वास आलं. राजधानी मुंबई शहरासह. हे सोपे नव्हते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवारहलाल नेहरु आणि सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली भारताची भाषावर प्रांतरचना झाली. यात महाराष्ट्र हे राज्य अस्तित्वास आले. मुंबई महाराष्ट्राची की गुजरातची यावरुन प्रचंड संघर्ष झाला. दिल्लीतील कारस्थानी नेत्यांचा डाव हाणून पाडत मुंबईसह मराहाष्ट्र निर्मिती करण्यास मराठी मनाला यश आले. त्यासाठी सुमारे 105 मराठी बांधव हुतात्मे झाले. अशा या खास दिवशी आपण जवळच्या मंडळींसोबत महाराष्ट्र दिन. Maharashtra Day Wishes, Messages, HD Wallpapers, GIFs, Whatsapp Status, Facebook Images च्या माध्यमातून शेअर करू शकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आपला संदेश समोरच्यापर्यंत पोहोचवू शकता. Happy Maharashtra Day 2020 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मराठमोळे Messages, Greetings, Quotes, Hike Stickers च्या माध्यमातून शेअर करून अभिमान वाढवा 'मी मराठी' असल्याचा!

महाराष्ट्र कामगार दिन महाराष्ट्र आणि भारतासह जगभरातील मराठी बांधव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या दिवशी सरकारी आणि खासगी कंपन्या, उद्योगांना सुट्टी असते. योगायोग असा की याच दिवशी जागतिक कामगार दिनसुद्धा असतो. तसेच युरोपमध्ये मपेल नावाचा काठी उत्सवही साजरा केला जातो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी महाराष्ट्र निर्मितीत विरमरण आलेल्या 105 हुतात्म्यांचे स्मरण केले जाते.

Maharashtra Day
Maharashtra Day

महाराष्ट्र निर्मिती आणि हुतात्म्यांचा लढा

तो दिवस होता 21 नोव्हेंबर इ.स. 1956. या दिवशी मुंबईतील फ्लोरा फाउंटन परिसरात तणाव होता. राज्य पुनर्रचना आयोगाने भाषावर प्रांतरचना करताना मुंबई महाराष्ट्राला देणे नाकारले. आयोगाच्या या निर्णयावर मराठी मन दुखावले. मराठी माणूस जागा झाला. मराठी माणसे चिडली. संपूर्ण राज्यासह मुंबईभर मोर्चे, सभा, आंदोलने होऊ लागली. यातच मोठे संघटन उभा राहिले. कामगारांचा एक विशाल मोर्चा तत्कालीन सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाउंटन परिसरात जमला. हा जनमुदाय चर्चगेट आणि बोरीबंदर (आताचे सीएसएमटी) अशा दोन्ही बाजूंनी आला. सरकारविरोधी घोषणा आणि मुंबईची मागणी यावर या मोर्चाचा भर होता. (हेही वाचा, Happy Maharashtra Day 2020 Messages: महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देणारे मराठी संदेश, Wishes, Greetings, WhatsApp Status, Facebook Images च्या माध्यमातून शेअर करून साजरा करा हा गौरवदिन!)

Maharashtra Day
Maharashtra Day
Maharashtra Day
Maharashtra Day

प्रचंड जनसमुदाय असलेला हा मोर्चा तत्कालीन मुख्यंत्री मोरारजी देसाई (हे तेव्हा संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते) यांनी पोलिसी बळाचा वापर करत मोडून काढण्याचे आदेश दिले. पोलिसांनी मोर्चावर लाठीचार्ज आणि गोळीबारही केला. पण, मराठी मन सरकारी ताकदीपुढे झुकले नाही. या संघर्षात 105 मराठी हुतात्मे झाले. पण, अखेर मुंबईसह महाराष्ट्र जन्माला आला. पुढे 1965 मध्ये याच ठिकाणी या 105 हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्मारक उभारण्यात आले.