
Maharashtra Day 2020 Marathi Messages: दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा 1 मे रोजी महाराष्ट्र दिन (Maharashtra Din) आणि कामगार दिन (Kamgar Din) साजरा केला जाणार आहे. दरवर्षी या दिवसाचे औचित्य साधून ठिकठिकाणी मोठमोठे सोहळे आयोजित केले जातात, आणि अगदी पारंपरिक ढंगात हे सेलिब्रेशन होते मात्र यंदा सर्व कार्यक्रमांवर कोरोनाचे सावट असल्याने हे सेलिब्रेशन घरातूनच करणे आवश्यक आहे. त्यातही सोशल मीडियावर सण साजरे करण्याची आपल्याला सवयच असल्याने हे काही कठीण नाही. यंदा महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक, कुटुंब आणि सोशल मीडियावरील परिवाराला शुभेच्छा देऊन हा दिवस साजरा करावा. यासाठी आम्ही आपल्याला काही तयार शुभेच्छापत्र देत आहोत तुम्हाला फक्त ही शुभेच्छापत्रे डाउनलोड करून मग पुढे तुम्हाला हवी तशी शेअर करायची मेहनत घ्यायची आहे. महाराष्ट्र दिन असल्याने खास मराठीतील संदेश, Wishes, Greetings तुम्हाला खाली पाहायला मिळतील. ती तुम्ही WhatsApp Status, Facebook Images च्या माध्यमातून शेअर करू शकाल. Maharashtra Day 2020: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जाणून घ्या या राज्याच्या गौरवशाली गोष्टी
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..

मंगल देशा...
पवित्र देशा...
महाराष्ट्र देशा...
प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा....
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्र दिनाच्या सर्व महाराष्ट्रवासीयांना
मनापासुन कोटी कोटी शुभेच्छा
महाराष्ट्र दिन चिरायु होवो

महाराष्ट्राची यशोगाथा,
महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी,
धरणी मातेच्या चरणी माथा.
जय महाराष्ट्र...
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

पैठणचे प्रेम अमित देश कोकणा...
पंढरीस ये विदर्भ देवदर्शना...
अजरामर ऐक्यभाव येथ दृढमती....
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्र दिनाची सुरुवात हा इतिहासातील एक महत्वाचा प्रसंग आहे. 1 मे 1960 दिवशी ब्रिटिश राजमधील ‘बॉम्बे’ प्रेसिडन्सी म्हणजे आजचा गुजरात (Gujrat) आणि महाराष्ट्र (Maharashtra) प्रदेश यांची भाषावार प्रांतरचनेनुसार दोन विविध आणि स्वतंत्र राज्यांमध्ये विभागणी झाली. 107 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र अस्तित्त्वात आला. यंदा महाराष्ट्रात 60 वा महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे या दिनाच्या लेटेस्टली परिवाराकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!