![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/07/6-Bendur-2022-380x214.jpg)
भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशातील अनेक सण-उत्सवही शेतीशी निगडीत असतात. यातील जवळ जवळ प्रत्येक सणामध्ये शेती, शेतकरी, बैल, शेतीची अवजारे आणि शेतीशी संबंधित अन्य गोष्टी आपसूकच येतात. असाच शेतीशी संबंधित एक सण म्हणजे बेंदूर (Maharashtra Bendur 2022). महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये मोठ्या उत्सवात हा सण साजरा होतो. आषाढ पौर्णिमेला महाराष्ट्रीय बेंदूर साजरा होतो. यंदा मंगळवार, 12 जुलै रोजी हा सण साजरा होणार आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो.
बेंदूर हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो. या दिवशी बैलांना नदीवर/ओढ्यात नेऊन त्यांना आंघोळ घालतात. बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात. नंतर त्याच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल घालतात. त्याच्या सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा व पायात तोडे घालतात. यादिवशी त्याला पुरणपोळीचा नैवद्य दाखवला जातो.
तर महाराष्ट्रीय बेंदूर सणानिमित्त खास Wishes, WhatsApp Messages, SMS, Facebook Status, Images च्या माध्यमातून तुम्ही बळीराजा आणि एकमेकांना शुभेच्छा देऊ शकता.
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/07/5-Bendur-2022.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/07/1-Bendur-2022.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/07/4-Bendur-2022.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/07/3-Bendur-2022.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/07/2-Bendur-2022.jpg)
दरम्यान, हिंदु संस्कृतीत वृक्षांप्रमाणेच वन्यजिवांना देखील पुजनीय मानल्या जाते. या दिवशी ज्यांच्या घरी बैल आहेत अशा घरात बैलांची पूजा तर होतेच मात्र ज्यांच्या घरी बैल नाहीत, असे लोक मातीच्या बैलांची पूजा करतात. या दिवशी प्रत्येक घरात गोडा-धोडाचे जेवण बनवले जाते.