Lord Krishna Death | (Photo Credit: File Photo)

Lord Krishna Death: ज्याच्या उल्लेखाशिवाय महाभारत (Mahabharata) हा विषय संपूच शकत नाही तो म्हणजे भगवान श्री कृष्ण. आजवर आपण श्री कृष्ण जन्माच्या आणि कार्याच्या अनेक कथा ऐकल्या असतील. गोकुळाष्टमी (Gokulashtami) अर्थातच श्री कृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami 2019) निमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या अनेक कार्यक्रमातून श्री कृष्ण (Lord Sri Krishna) जन्माच्या कथा ऐकत नेहमीच सांगितल्या जातात. पण, आपण श्री कृष्ण मृत्यू (Krishna Death) याबाबत कधी ऐकले आहे का? महर्षी व्यास (Vyasa) यांनी महाभारत या ग्रंथात या युद्धाचा संपूर्ण घटनाक्रम सविस्तर लिहिला आहे. महाभारत हा ग्रंथ 18 खंडात संकलित करण्यात आला आहे. कुरुक्षेत्रावरील युद्ध हा या ग्रंथातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा भाग आहे. पण, या युद्धाच्या समाप्तीनंतरही बरेच काही घडल्याचे महाभारतात सांगितले आहे. जे जाणून घेणे बरंच रंजक आहे. यात श्री कृष्ण मृत्यू याबाबतही सविस्तर लिहिले आहे.जाणून घेऊया काय आहे श्री कृष्ण यांच्या मृत्यूची कहाणी अर्थातच कसा झाला भगवान श्री कृष्ण मृत्यू.

भगवान श्रीकृष्ण यांना गांधारीचा शाप

महाभारत आणि त्यावर लिहिल्या गेलेल्या अनेक ग्रंथांमध्ये श्री कृष्ण मृत्युबाबत उल्लेख सापडतो. महाभारत आणि वेद पुराणाचे जाणकारही आपल्याला याबाबत माहिती देतात. सांगितले जाते की, महाभारतामध्ये कौरव आणि पांडव यांच्यात अंतिम युद्ध झाले. यात दुर्योधनाचा अंत झाला. दुर्योधनाच्या मृत्यूमुळे त्याची आई गांधारी प्रचंड दु:खी झाली. आपल्या मुलाच्या दु:खाने व्याकूळ झालेली ती माता थेट युद्धभूमिवर गेली. त्या वेळी तिच्यासोबत भगवान श्री कृष्ण आणि पांडव हे देखील गेले होते. आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे गांधारी इतकी व्यथित झाली की तिने भगवान श्री कृष्ण यांना शाप दिला.

भगवान श्री कृष्ण यांनी हसतमुखाने स्वीकारला गांधारीचा शाप

गांधारी हिने भगवान श्रीकृष्ण यांना शाप दिला की, श्री कृष्ण, आजपासून (दुर्योधन मृत्यूचा दिवस) पुढील 36 वर्षांनंतर तुमचाही मृत्यू होईल. गांधारी हिचा शाप ऐकूण भगवान श्री कृष्ण यांनी मंदस्मीत केले. तसेच, गांधारीने दिलेल्या शापाचा हसत हसत नम्रपणे स्वीकारही केला. पुढे सांगितले जाते की, त्या दिवसापासून पुढे बरोबर 36 वर्षांनी एका शिकाऱ्याच्या हातून भगवान श्री कृष्ण यांचा मृत्यू झाला.

श्री कृष्ण मृत्यू कहाणी

महाभारतात कौरव आणि पांडव यांच्यात कुरुक्षेत्र येथे युद्ध झाले. हे युद्ध इतके घणघोर होते की, या युद्धपातात झालेल्या रक्तपातामुळे पुढची अनेक वर्षे इथली माती लाल रंगाचीच राहिली आहे. आजही इथे लाल रंगाची माती आढळते. एका बाजूला 100 कौरव आणि दुसऱ्या बाजूला 5 पांडव यांच्यात हे युद्ध झाले. स्वार्थ, इर्षा आणि अहंकार या गोष्टी या युद्धाला कारण ठरल्या. या युद्धात भगवान श्री कृष्ण, भीष्म पितामह, द्रोण, शिखंडी यांसारख्या अनेक धुरंधरांनी सहभाग घेतला होता. (हेही वाचा, यंदा गोकुळाष्टमी चा उपवास, पूजा कधी कराल?)

महर्षी वेद व्यास यांनी महाभारताची कहाणी एकूण 18 खंडांमध्ये लिहीली आहे. मौसल पर्व 18 पर्वांपैकीच एक आहे. जे 8 व्या अध्यायाचे संकलन आहे. यात श्री कृष्ण यांचा मानवलोकातील आपला अवतार संपुष्टात आल्यानंतर त्यांची नगरी द्वारका येथे घडलेल्या स्थितिचे वर्णन आहे.

मौसल पर्व कहाणी

ही घटना कुरुक्षेत्र युद्धानंतर 35 वर्षांनंतर घडलेली आहे. कृष्णाची द्वारका नगरी ही अत्यंत शांत, सुखी आणि या पृथ्वीलोकावरचे एक अद्भूत ठिकाण होते. एके दिवशी कृष्ण पूत्र सांब यांना लहर आली. त्यांनी स्त्रीवेश धारण करुन आपल्या मित्रांसोबत ते ऋषि विश्वामित्र, दुर्वासा, वशिष्ठ आणि नारद यांना भेटण्यास गेले. ऋषि विश्वामित्र, दुर्वासा, वशिष्ठ आणि नारद हे भगवान श्रीकृष्ण यांच्या अनौपचारिक भेटीसाठी द्वारकेस आले होते. स्त्री वेशात आलेल्या सांब यांनी त्या तीन ऋषींना सांगितले की आपण गर्भवती आहोत. तसेच, आपल्या गर्भातील बाळाचे लिंग काय आहे? ऋषि विश्वामित्र, दुर्वासा, वशिष्ठ आणि नारद यातील एका ऋषीने सांब यांचा खेळ ओळखला. ते क्रोधीत झाले. त्यांनी रागाच्या भरात सांब याला शाप दिला की, तूझ्या पोटातून एक लोखंडी बाण जन्माला येईल. याच बाणातून तुझे कूळ आणि साम्राज्य लयाला जाईल. ते समूळ नष्ट होईल.

कृष्णाच्या नगरित जनतेला अशुभ संकेत

सांब याने घडला प्रकार उग्रसेन याला सांगितला. उग्रसेन याने सांब याला सल्ला दिला की, तू एका तांबे धातूच्या बाणाचे चूर्ण कर आणि ते प्रभास नदीच्या प्रवाहात सोडून दे. ज्यामुळे तुची या शापापासून मुक्तता होईल. सांब याने उग्रसेन याचा सल्ला प्रमाण मानून कृती केली. परंतू, उग्रसेन याने या सोबतच आणखीही एक सल्ला सांब याला दिला होता. तो म्हणजे यादव राज्यात कोणत्याही प्रकारची नशीले पदार्थ ना सेवन केले जातील. ना त्याचे उत्पादन अथवा वितरण केले जाईल. या घटनेनंतर द्वारकेतील लोकांनी काही अशुभ आणि विचीत्र संकेतांची अनुभुती घेतली. जसे की, सुदर्शन चक्र, कृष्ण यांचा शंख, रथ आणि बलराम यांचा नांगर अदृश्य होणे वैगेरे वैगेरे. दरम्यन, नगरीत पापही वाढले, लज्जा, प्रेम, आदर या गुणांनाही ओहोटी लागली. पती पत्नी एकमेकांच्या नात्यांमध्ये अविश्वास व्यक्त करु लागले. जेष्ठ, वडीलधाऱ्यांना अपमानीत केले जाऊ लागले. आदर नाहीसा झाला. नगरीतील उद्योगधंदा, व्यापारउदीम मंदावला. या सर्व गोष्टी पाहून भगवान श्री कृष्ण व्यथित झाले. त्यांनी आपल्या प्रजेला सल्ला दिला की, आपल्या पापांपासून मुक्ती करण्यासाठी प्रभास नदीकाटावर जाऊन तिर्थ यात्रा करावी. जनतेनेही तसेच केले. सर्व यादव प्रभास नदीच्या काठावर पोहोचले. पण, ते सर्व लोक मद्य आणि नशेच्या अंमलाखाली होते.

गवताच्या काडीचे लोखंडी काठीत रुपांतर

दरम्यान, नशेच्या धुंदीत असलेला सात्यकी हा कृतवर्मा याच्याजवळ पोहोचला आणि त्याने अश्वत्थामा याला मारण्याचा कट रचल्याबद्दल तसेच, पांडव सेनेच्या शिपायांवर त्याच्या हत्येबद्दल टीका करु लागला. कृतवर्मा यानेही सात्याकी याच्यावर प्रतिआरोप केले. वाद वाढत गेला आणि त्याच वेळी सात्यकी याच्या हातून कृतवर्मा याची हत्या झाली. कृतवर्मा याच्या हत्येमुळे क्रोधीत झालेल्या इतर यादवांनी मिळून सात्यकी याची हत्या केली. या घटनेची माहिती श्री कृष्ण यांना झाली. ते घटनास्थळी प्रकट झाले. त्यांनी गवताची काडी हातात घेतली. या काडीचे लोखंडी काठीत रुपांतर झाले. ज्याच्या माध्यमातून श्री कष्ण यांनी दोषींना सजा दिली.

श्री कृष्णाचा निरोप घेऊन दारुक इंद्रप्रस्थकडे रवाना

दरम्यान, नशेत धुंद असलेल्या या लोकांनीही गवताच्या काड्या हातात घेतल्या. ज्याचे रुपांतर लोखंडी काठ्यांमध्ये झाले. हातात काठ्या असलेलेल लोक एकमेकांशी भिडले. एकमेकांना मारु लागले. यात वभ्रु, दारुक आणि कृष्ण यांच्याशिवाय इतर सर्व लोक मारले गेले. बलराम या घटनेचा भाग नव्हते. त्यामुळे ते वाचले. परंतू, काही वेळाने बलराम आणि वभ्रु यांचाही मृत्यू झाला. त्यानंतर कृष्ण यांनी दारुक याला पांडवांकडे पाठवले आणि सांगितले की, अर्जूनाला सर्व घटना समजावून सांग आणि माझ्या मदतीला घेऊन ये.

जीरु नामक शिखाऱ्याकडून श्री कृष्णाचा मृत्यू

दारुक भगवान श्रीकृष्णाचा निरोप घेऊन इन्द्रप्रस्थकडे रवाना झाला. पाठिमागे श्रीकृष्णांनी आपल्या देहाचा त्याग केला. कृष्ण मृत्यूची घटना ही प्रभास नदीशी संबंधीत आहे. ज्यात चूर्ण वाहिले गेले होते. लोखंडी छडीचे चूर्ण एका माशाने गिळले. या माशाच्या पोटात ते एक धातूचा तुकडा बनूण राहिले. जीरू नामक शिकाऱ्याने तो मासा पकडला. त्याच्या शरीरातून तो धातूचा तुकडा काढला. त्यापासून एक धनुष्यबाण निर्माण केला. श्रीकृष्ण जंगलात ध्यानासाठी बसले होते. जीरुला वाटले की, ते एखादे हरीण असावे. त्याने बाण सोडला. याच बाणामुळे भगवान श्रीकृष्ण याचा मृत्यू झाला.

द्वारका नगरी पाण्यात गेली

दरम्यान, काही वेळाने अर्जुन श्रीकृष्णाच्या मतदीसाठी द्वारकेला पोहोचला. पण, तोपर्यंत कृष्णाचा मृत्यू झाला होता. कृष्ण मृत्यूची बातमी ऐकून अर्जुन दु:खी झाला. कृष्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या 16000 राण्या, महिला, अबाल-वृद्ध दु:खी झाले. पुढे ते सर्वजण इन्द्रप्रस्तकडे निघाले. पण, हे लोक जसेही द्वारका सोडू लागले तसे पाण्याची पातळी वाढली. म्लेच्छ आणि काही शस्त्रधारींनी द्वारकेवर आक्रमण केले. जनतेच्या बचावासाठी अर्जुन पुढे धावला. पण, धनुष्य उचलताच तो सर्व मंत्र विसरुन गेला. द्वारका नगरी पाण्यात गेली.

कृष्ण मृत्यूनंतर द्वारकेचा अंत

अर्जुन, श्रीकृष्ण आणि त्यांच्या राण्या तसेच काही प्रजा घेऊन इन्द्रप्रस्थला पोहोचला. त्याने ही घटना बंधू युधिष्ठीर याला सांगितली. भगवान श्री कृष्ण यांच्यानंतर यादवांचा वंश हळूहळू संपत गेला. द्वारका समुद्रात बुडाली. अशा पद्धतीने भगवान श्री कृष्ण यांचा मृत्यू झाला. द्वारकेचा अंत झाला.