Koregaon Bhima Anniversary 2019 :  201 वर्षांपूर्वी भीमा -कोरेगाव येथे काय घडलं ज्यामुळे 1 जानेवारी शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो
Bhima Koregaon (photo credits: Twitter)

Koregaon Bhima Anniversary: वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी हिसाचार पसरला होता. कोरेगाव - भीमा (Koregaon Bhima) ठिकाणी विजयस्तंभाच्या 200 व्या वर्षपूर्तीदिनी तणाव होता. महाराष्ट्रभर या घटनेचे पडसाद उमटले होते. मात्र नेमकं काय झालं कुणालाच ठाऊक नव्हतं. कोरेगाव भीमा या ठिकाणाचं, विजयस्तंभाचं महत्त्व आजही कित्येकांना ठाऊक नाही. म्हणुणच आजच्या दिवशी जाणून घ्या नेमका कोरेगाव - भीमा विजयस्तंभाचा इतिहास काय?

कोरेगाव - भीमा विजयस्तंभाचा इतिहास काय?

1 जानेवारी 1818 दिवशी ब्रिटीश ईस्ट इंडीया कंपनीचे कॅप्टन. एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृत्वातील महार बटालियनच्या 500 सैनिकांनी 28000 पेशवा सैन्याचा पराभव केला. इंग्रजांच्या बाजूने लढलेली महार बटालियनच्या शौर्याचे प्रतिक म्हणून या भागात खुद्द ब्रिटिशांनी विजयस्तंभ उभारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील या विजयस्तंभाला भेट दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्रात पेशव्यांची मराठेशाहीला आली. मात्र सेनादलात अस्पृश्य जाती, जमातीला, शूद्र समाजाला नगण्य स्थान देण्यात आलं. अस्पृश्यतेच्या विरोधात त्यावेळी महारांचे सरदार दुसरे सिदनाक यांनी श्रीमंत बाजीरावांना महारादी अस्पृश्य जाती-जमातींना अस्मितेने वागवले जावे अशी विनवणी केली होती. मात्र त्याचा गांभीर्याने विचार करण्यात आला नाही. त्यावेळेस पेटलेल्या युद्धामध्ये महार ब्रिटिशांच्या बाजूने पेशव्यांविरोधात शौर्याने आणि त्वेषाने लढले. अवघे 500जणांची महार बटालियन पेशव्याच्या 28000 सैनिकांवर तुटून पडली आणि ब्रिटिशांचा विजय झाला. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या 201 व्या वर्षपूर्ती दिनी लाखोंची गर्दी; चोख सुरक्षा व्यवस्था, वाहतुकीमध्ये बदल

पुण्यात भीमा नदीच्या किनाऱ्यावर कोरेगाव या भागात ही लढाई झाली. ही लढाई म्हणजे समाजात अस्पृश्यतेच्या विरोधात पुकारलेले हे पहिले बंड होते.त्यामुळे आंबेडकर अनुयायी या दिवशी राज्यभरातून विजयस्तंभाजवळ येतात. अभिवादन करून या शौर्यदिनाची आठवण जागवतात.