कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या 201 व्या वर्षपूर्ती दिनी लाखोंची गर्दी; चोख सुरक्षा व्यवस्था, वाहतुकीमध्ये बदल
Vijay Stambh' on the 201st anniversary ( Photo Credits: Twitter/ANI)

Koregaon Bhima Vijay Stambh 201st anniversary : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या 201 व्या वर्षपूर्ती निमित्त अभिवादन करण्यासाठी आज राज्यभरातून लोकांनी गर्दी केली आहे. याच ठिकाणी वर्षभरापूर्वी हिंसाचार पेटला होता. त्याच्या पार्श्वभूमीवर यंदा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. छुपे कॅमेरे, सीसीटीव्ही, ड्रोन यांच्या मदतीने जमावावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. पुण्यात भीमा नदीच्या किनाऱ्यावर कोरेगाव या भागात ही लढाई झाली. ही लढाई म्हणजे समाजात अस्पृश्यतेच्या विरोधात पुकारलेले हे पहिले बंड होते.त्यामुळे आंबेडकर अनुयायी या दिवशी राज्यभरातून विजयस्तंभाजवळ येतात. अभिवादन करून या शौर्यदिनाची आठवण जागवतात. Koregaon Bhima Anniversary 2019 : 201 वर्षांपूर्वी भीमा -कोरेगाव येथे काय घडलं ज्यामुळे 1 जानेवारी शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो.

विजयस्तंभ कशाचं प्रतीक?

भीमा कोरेगाव हा विजयस्तंभ पेशवे आणि ब्रिटिशांमधील लढाईच्या महार बटालियनने बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेचं प्रतीक आहे. दरवर्षी 1 जानेवारी दिवशी आंबेडकर अनुयायी या ठिकाणी एकत्र जमतात.   1818 मध्ये ही लढाई झाली होती. ब्रिटिश आणि पेशवा बाजीराव यांच्यामध्ये रंगलेल्या युद्धात मराठयांची सेना हरली. इंग्रजांच्या सैन्यामध्ये प्रामुख्याने दलित, महार समुदायाची लोकं होती. त्यामुळे दरवर्षी महार समुदयातील लोकं हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करतात

वाहतुकीमध्ये बदल

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायीच्या सोईसाठी सोमवार रात्रीपासूनच वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. नगरकडून हडपसरकडे येणारी वाहने शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-न्हावरा-केडगाव चौफुला-सोलापूर महामार्गावरुन हडपसरकडे वळवली आहेत. पुण्याकडून नगरकडे जाणारी वाहने चाकण मार्गे किंवा खराडी बाह्य़वळण येथून नगरकडे वळवली आहेत.