Kargil Vijay Diwas 20th Anniversary: भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये लढल्या गेलेल्या कारगिल युद्धाला यंदा 20 वर्ष पूर्ण होणार आहेत. यंदा 26 जुलै 2019 ला या युद्धाची 20 वी वर्षपूर्ती आहे. 26 जुलै दिवशी अधिकृतरित्या युद्ध संपल्याची घोषणा करण्यात आल्याने हा दिवस करगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas) म्हणून ओळखला जातो. जम्मू काश्मिर येथील कारगिलच्या शिखरांवर हे युद्ध रंगलं. 3 मे ते 26 जुलै 1999 दरम्यान कारगिल युद्ध (Kargil Conflict )झाले. पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले. यानंतर घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुमारे साडे तीन महिने रंगले. हे युद्ध अतिउंच भागावरील युद्धाचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील या युद्ध नीतीसाठी भारतीय सैनिकांचे आणि भारताच्या संयमाचे कौतुक करण्यात आलं आहे. कारगिर युद्धातील विजयाला 20 वर्षे पूर्ण झाल्याने राज्यातील 450 सिनेमागृहांमध्ये 'उरी'चे मोफत शो; तरुणाईसाठी राज्य शासनाचा खास निर्णय
कारगिल युद्धाची काही खास वैशिष्ट
- कारगिल ही जम्मू काश्मिरची राजधानी आहे. श्रीनगरपासून त्याचे अंतर सुमारे 205 किमी आहे. हे पाकव्याप्त काश्मिरपासून जवळ असल्याने या भागात पाकिस्तानी घुसखोर आले होते.
- 1998-99 च्या हिवाळ्यात पाकिस्तानी लष्करातून अनेक तुकड्यांना मुजाहिदीनच्या वेषात भारतात LOC पलीकडे पाठवण्यात आले. या कारवाईला ऑपरेशन बद्र असे नाव देण्यात आले होते. कुणाच्याही लक्षात न येता त्यांनी रिकाम्या भारतीय चौक्यांचा ताबा घेतला होता.
- मे महिन्यात दुसऱ्या आठवड्याच्या सुमारास स्थानिक मेंढपाळ यांनी घुसखोरीची सूचना भारतीय सैन्याला दिली. त्या माहिती नुसार भारतीय सैनिकांनी टेहळणीसाठी तुकडी पाठवून हल्ला केला. तेव्हा पाकिस्तानकडून घुसखोरी झाल्याचे आपल्या लष्कराच्या लक्षात आलं.
- 26 जुलै दिवशी भारताने कारगिल युद्धामध्ये विजय मिळवलं. कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या सुमारे 3 हजार सैनिकांना ठार मारलं. हे युद्ध 18 हजार फीट उंचीवर लढलं गेलं.
- पाकिस्तानकडून कारगिलवर विजय मिळवण्यासाठी सुमारे 5000 सैनिकांची तुकडी पाठवण्यात आली होती. मात्र भारतीय सैनिकांनी त्यांना जशास तसे उत्तर दिले.
- 8 मे दिवशी कारगिल युद्ध सुरू झाल्यानंतर 11 मे दिवशी भारतीय वायुसेनेने मदतीसाठी हात पुढे केला. या युद्धामध्ये वायुसेनेच्या सुमारे 300 विमानांचा वापर करण्यात आला.
- कारगिलच्या युद्धामध्ये बोफोर्स तोफांचा वापर करण्यात आला होता.
- भारतीय वायुसेनेने देखील कारगिल युद्धामध्ये मोठं योगदान दिलं आहे. भारतीय वायुसेने पाकिस्तानच्या विरोधात मिग 27, मिग 29 चा देखील वापर केला होता. पाकिस्तानने ज्या भागावर कब्जा मिळवला होता तेथे बॉम्बहल्ले केले. पाकिस्तानच्या अनेक ठिकाणी आर-77 मिसाईलद्वारा हल्ला करण्यात आला होता.
- कारगिल युद्धातील विजयाची घोषणा तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 14 जुलै दिवशी केली. मात्र औपचारिकरित्या ही घोषणा 26 जुलै दिवशी कारगिल विजय दिनाची घोषणा करण्यात आली आहे.
- कारगिल युद्धामध्ये भारताचे 527 जवान शहीद झाले तर 1363 जवान जखमी झाले आहेत.
भारताला कारगिल युद्धा दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळाला, त्यामुळे पाकिस्तानवर अमेरिसह जगातील अनेक देशांनी सैन्य मागे घ्यावे यासाठी दबाव टाकला होता. परिणामी पाकिस्तानात राजकीय अस्थिरता होती. पुढील काही महिन्यात पाकिस्तानचे जनरल परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांचे सरकार उलथून लष्करशाही लागू केली.