1999 च्या कारगिर युद्धात पाकिस्तानचा पराभव करत भारताने विजय प्राप्त केला. यंदा या विजयाला 26 जुलै रोजी 20 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी राज्यातील 450 सिनेमागृहांमध्ये 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' (Uri: The Surgical Strike) या सिनेमाचे मोफत प्रसारण करण्यात येणार आहे. 26 जुलै रोजी असलेल्या 'कारगिर विजय दिना'निमित्त राज्यातील युवकांमध्ये देशाच्या सैन्याप्रती कर्तव्याची भावना आणि अभिमान जागृत व्हावा, वाढावा म्हणून राज्य शासनाने हा विशेष निर्णय घेतला आहे. Kargil Vijay Diwas 2019: भारत-पाकिस्तान दरम्यान 1999 ला झालेल्या कारगिल युद्धाची 10 वैशिष्ट्यं
यासाठी मुंबईत पार पडलेल्या बैठकीत सिनेमाचे वितरक, सिनेमागृहांचे मालक आणि सिनेमा संघटना यांचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत 'उरी' सिनेमा 450 सिनेमागृहांमध्ये मोफत दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे 26 जुलै रोजी सकाळी 10 वाजता महाराष्ट्रातील 450 सिनेमागृहांमध्ये 'उरी' सिनेमा मोफत पाहता येईल. उरी सिनेमामध्ये मनोहर पर्रिकर यांची भुमिका साकरणार्या योगेश सोमण यांची श्रद्धांजली (Watch Video)
'उरी' सिनेमाचे यश केवळ बॉक्स ऑफिसपर्यंत मर्यादीत राहिले नाही तर देशातील अनेक दिग्गज, मान्यवर मंडळींपासून अगदी सामान्यांपर्यंत सर्वांनी सिनेमाचे भरभरून कौतुक केले. सिनेमातील कलाकार विशेषतः विक्की कौशलच्या अभिनयाने तर सर्वांनाच आनंद दिला. (संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण Uri: The Surgical Strike सिनेमाच्या कलाकारांच्या भेटीला)
1999 मध्ये पाकिस्तानने घुसखोरी केल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली. या विरुद्ध भारताने पाकिस्तान विरोधात 'ऑपरेशन विजय' ही कारवाई केली. तब्बल 77 दिवस चालेल्या या युद्धात अखेर पाकिस्तानला हार पत्करावी लागली आणि भारताने आपल्या विजयाचा झेंडा रोवला.