उरी सिनेमामध्ये मनोहर पर्रिकर यांची भुमिका साकरणार्‍या योगेश सोमण यांची श्रद्धांजली (Watch Video)
Yogesh Soman and Manohar Parrikar (Photo Credits: Facebook)

वयाच्या 63 व्या वर्षी गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचे 17 मार्च दिवशी संध्याकाळी निधन झाले. पर्रिकरांच्या निधनाचं वृत्त समजताच गोवेकरांसोबतच राजकीय क्षेत्र आणि कलाकार मंडळीदेखील हळहळली. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. यामध्ये एक विशेष नाव म्हणजे योगेश सोमण. सर्जिकल स्ट्राईकवर आधारित 'उरी' (Uri) सिनेमामध्ये योगेश सोमण(Yogesh Soman) यांनी मनोहर पर्रिकर यांची भूमिका साकारली आहे. मनोहर पर्रीकर यांचा बळी घेणारा 'स्वादुपिंडाचा कॅन्सर' World’s Toughest Cancer म्हणून ओळखला जातो, या कॅन्सरमध्ये रुग्ण बचावण्याची शक्यता अत्यल्प का असते?

योगेश सोमण यांची श्रद्धांजली

उरी या सिनेमाने यंदा बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी केली. भारताने पाकिस्तानवर केलेल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी विशेष भूमिका बजावली होती. मनोहर पर्रिकर आणि योगेश सोमण यांच्या चेहर्‍यामध्ये साधर्म्य असल्याने त्यांचं नाव खूप चर्चेमध्ये आलं होतं. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर योगेश सोमण यांनी पर्रिकर आणि त्यांच्यामधील या साधर्म्यामुळे मिळालेल्या कौतुकाचे आभार मानत मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

योगेश सोमण यांच्यासोबतच अनेक मराठी कलाकारांनी मनोहर पर्रिकरांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

स्वप्नील जोशी

जितेंद्र जोशी 

रितेश देशमुख 

आज संध्याकाळी मिरामार बीचवर मनोहर पर्रिकर यांच्यावर अंतिम संस्कार होतील.