Kalpana Chawla Death Anniversary: अंतराळात प्रवेश करणारी पहिली भारतीय 'अवकाशपरी'- कल्पना चावला
अवकाशपरी कल्पना चावला (फोटो सौजन्य- ट्वीटर)

Kalpana Chawla Death Anniversary: अवकाशात प्रवेश करण्याचे स्वप्न उराशी बाळगून सातत्याने त्यासाठी मेहन करणारी 'अवकाशपरी' कल्पना चावला (Kalpana Chawla) हिचा आज (1 फेब्रुवारी) स्मृतीदिन आहे. अंतराळवीरांमधील एक अशी भारतीय (Indian) महिला कल्पना चावला ही सर्वांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे.

17 मार्च 1965 रोजी हरियाणा येथे कल्पना चावला यांचा जन्म झाला. त्यानंतर शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी अंतराळात प्रवेश करुन राहणार असे ठाम मत मांडत आपले प्रयत्न सुरु केले. तर 1982 रोजी एरोनॉटिकल अभियांत्रिकीची पदवी मिळवत 1984 मध्ये टेक्सास विद्यापीठातून उच्च- अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. 1988 रोजी मात्र कोलोरॅडो विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिती विभागतून डॉक्टरेट ही पदवी संपादन केली.

1988 रोजीचा काळ सुरु होता तेव्हा नासा एम्स रिचर्स सेंटर येथे त्यांनी Vertical/Short Takeoff and Landing वर संगणकीय द्रव प्रेरक शक्ती [ Computational fluid dynamics (CFD) ] चे संशोधन केले. त्यानंतर 1991 मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व स्विकारात नासा एस्ट्रेनात कॅम्प येथे भरती होण्यासाठी कल्पना चावला यांनी अर्ज केला. तर पुढील पाच वर्षात 1995 साली कॉपर्स मध्ये त्यांची निवड होऊन 1996 रोजी 15 व्हा अंतराळवीर समूहात त्यांची अंतराळात उड्डाणासाठी निवड करण्यात आली.

मात्र 1 फेब्रुवारी रोजी जी घटना घडली त्या घटनेमुळे अजूनही एखाद्याच्या डोळ्यात पाणी उभे राहिल अशी ती परिस्थिती होती. कल्पना चावला यांचा 1 फेब्रुवारी 2003 रोजी अवकाशातून पृथ्वीवर येणाऱ्या कोलंबिया अवकाशयानाला स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होती की, त्या अवकाशयानाचा अगदी चुरा होऊन गेला होता. या भयंकर धक्कादायक घटनेमध्ये स्फोट झालेल्या अवकाशयानात कल्पना चावला आणि अन्य अंतराळवीरांचा मृत्यू झाला.

परंतु कल्पना चावला आणि अन्य अंतराळवीरांच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी टेक्सास शहर आतुरतेने या सर्वांची वाट पाहत होते. मात्र अंतराळवीरांच्या कोलंबिया या याना स्फोट झाल्याची बातमी कळताच सर्वांचे चेहरे खाली उतरले होते. त्यानंतरचा काही कालावधीत कल्पना चावला ही तरुण वर्गासाठी प्रेरणास्थान बनली. कल्पना चावला यांच्या विचाराने अनेकांना आयुष्यात उंच भरारी घेण्यासाठी पंखात बळ दिले.