अंतराळवीर असल्याचं सांगून एका व्यक्तीने महिलेला 24.8 लाखांचा गंडा घातल्याची एक बाब समोर आली आहे. आपण आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर काम करणारा रशियन अंतराळवीर असल्याचं महिलेला त्याने सांगितलं. पृथ्वीवर परतल्यानंतर लग्न करू असं आमिषही दाखवत 65 वर्षीय महिलेकडून 4.4 मिलियन येन अर्थात 24.8 लाख लुबाडल्याचं समोर आलं आहे. आपली फसवणूक झाल्याचं महिलेच्या लक्षात आले.
शिगा प्रिफेक्चर मध्ये राहणार्या एका महिलेची जून मध्ये इंस्टाग्राम वर बनावट अंतराळवीर सोबत ओळख झाली. मीडीया रिपोर्ट्सनुसार, त्याच्या प्रोफाईल मध्ये अंतराळातील काही फोटोज होते. यामुळे महिलेच्या मनात गैरसमज निर्माण झाले हा व्यक्ती स्पेस स्टेशन मध्ये काम करतो. रिपोर्ट्सनुसार, दोघांनीही मेसेज वर चॅटिंग सुरू केले. जपानी मेसेजिंग अॅप वर त्यांनी पुढे चॅटिंग सुरू ठेवले. नंतर आपण प्रेमात पडलो असल्याचं महिलेकडे कबूल केले. हे देखील नक्की वाचा: Fraud: वृद्ध महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी बनावट डॉक्टरसह साथीदाराला पुण्यातून अटक.
जपान मध्ये नवीन संसार सुरू करण्याचे प्लॅनिंग त्यांनी ऑनलाईन चॅटिंग द्वारा केले. अशावेळी आपण अंतराळातून पृथ्वीवर येण्यासाठी आपल्याला पैशाची गरज असल्याचं त्याने सांगत महिलेकडे पैसे मागितले. रॉकेटसाठी लॅडिंग फी भरावी लागते आणि ती भरून जपानला परतू शकेन असे त्याने सांगितले. महिलेनेही त्यावर विश्वास ठेवत 19 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या काळात 5 हप्तांत 4.4 दशलक्ष येन पाठवले. मात्र त्याच्याकडून वारंवार पैशांची मागणी होत असल्याने महिलेला संशय आला. त्यानंतर पोलिसांकडे तिने तक्रार केली.